सायाळा, येळी, भोगाव येथे 3 कोटी 25 लाख रुपयाच्या कामाचे भुमिपुजन
हिंगोली / प्रतिनिधी
ग्रामीण भागात पक्क्या रस्त्याची निर्मिर्ती झाली तर वाहतुक दळण-वळणाच्या साधनामुळे अर्थक्रांती साधता येईल. यामुळे गावातील प्रत्येक सुजान नागरिकांनी हि कामे दर्जेदार कशी होतील या दृष्टीने पुढाकार घेऊन आपल्या गावच्या विकासाला हातभार लावावा असे प्रतिपादन येळी येथे रस्त्याच्या भुमिपुजनप्रसंगी बोलतांना खा.राजीव सातव यांनी केले.
कळमनुरी विधानसभा क्षेत्रात खा.राजीव सातव यांच्या हस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सायाळा, येळी, भोगाव येथे 3 कोटी 25 लाख रुपयाच्या रस्ता कामाचे भुमिपुजन करण्यात आले. या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी कळमनुरीचे आ.संतोष टारफे हे होते. यावेळी बाबा नाईक, शामराव जगताप, एस.पी. राठोड, केशवराव नाईक, ज्ञानेश्वर जाधव, श्रीराम जाधव, बाबाराव शिंदे उपस्थित होते. यावेळी बोलतांना खा.सातव पुढे म्हणाले की, प्रत्येक गावात प्रमुख महामार्गाना जोडणारा पक्का रस्ता झाल्यास ग्रामीण भागातील अर्थक्रांती बदलेल यामुळे आपण प्रत्येक गावात पक्के रस्ते कशापध्दतीने साकारता येतील यासाठी पुढाकार घेत असुन, ग्रामीण भागात मुलभुत सेवा सुविधा पुरविण्यावर भर देण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. जनतेने देखील विकास कामे दर्जेदार होतील यादृष्टीने पुढाकार घेण्याचे प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
तर आ.संतोष टारफे यांनी कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहुत असे सांगत आगामी काळात ग्रामीण भागात मुलभुत सुविधांवर भर देणार असल्याचे सांगीतले. तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत रिंगरोड ते मौजे सायाळा 237.07 लाख रुपये, तर येळी येथे 58.33 लाख रुपये व भोगाव येथे 31.5 लाख रुपयांच्या कामाचे भुमिपुजन करण्यात आले. आयोजीत विविध कार्यक्रमास विष्णू जाधव, कैलास मस्के, नागोराव मस्के, मानीकराव मस्के, प्रकाश पोले, धोंडबाराव नाईक, विजय नाईक, दादाराव मस्के, दत्तराव मस्के, नामदेव नागरे, बापूराव बांगर, एल.जी.घुगे, राजू आप्पा, उमाकांत शेवाळकर, ऋषिकेश देशमुख, बाळू पारस्कर, डॉ. अवधूत मस्के, रविशंकर पाटील, अनिल राठोड, प्रेमदास आडे, गावातील सरपंच प्रफुल्ल अप्पा कापसे, दिनकर अप्पा शिवाजी तोरकड, संजय लिंबाळकर, गंगाधर अप्पा महाजन, ओंकार रामेश्वरे, जयवंतराव पाटील, महारुद्रपपा लिंबाळकर, मधुकर अप्पा लिंबाळकर, शिवाजी गुडूप, पिंपरखेड सरपंच सोनटक्के, चंदू प्यारेवाले (गारमाळ), संभाजी गुंजकर, पंडित गिते, गिरीश घुगे, झमझम भाई, अल्लाबक्ष, शे. इमान भाई, सय्यद अल्लाउद्दीन, रवि घुगे, सय्यद कम्सूद्दीन, बालाजी गिते, दत्तराव इंगळे सह ग्रामस्थ व कॉंग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

No comments:
Post a Comment