हिंगोली / प्रतिनिधी
जिल्हा परिषद शिक्षण विभाग माध्यमिकची दैनंदिन कामे व प्रशासकीय कामकाज पाहण्यासाठी पुर्णवेळ शिक्षणाधिकारी(माध्यमिक) नियुक्त करण्याची मागणी 1 ऑक्टोबर रोजी हिंगोली जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यामिक शाळा मु.अ.संघाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शिक्षणाधिकारी डी.आर.चवणे यांच्या बदलीनंतर माध्यमिक विभागाला पुर्णवेळ शिक्षणाधिकारी यांची शासनाने नियुक्ती केलेली नाही. माध्यमिक विभागाचा पदभार इंगोले, सोनटक्के व डायटचे ससाणे यांच्याकडे दिला. परंतू, 10 सप्टेंबर रोजी पासून कोणतेही अधिकारी या पदाचा कार्यभार सांभाळत नाहीत व सर्व दैनंदिन कामे ठप्प पडत आहेत. त्यामुळे माध्यमिक विभागाचा पदभार पुर्णवेळ शिक्षणाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी हिंगोली जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मु.अ.संघाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर के . डी. महाजन, एस.यु.सुर्यवाड, एम.एस.सवंडकर, एस.जी.इप्पर, शेख अबरार अहेमद आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments:
Post a Comment