लातूरात स्पोर्टस स्कुल व्हावे ही आमची इच्छा आहे बॅडमिंटन असोसिएशनचे महाराष्ट्र वरिष्ठ उपाध्यक्ष : अ‍ॅड.आशिष बाजपायी

Friday, October 5, 2018

लातूर / प्रतिनिधी
लातूर येथील ख्यातनाम विधीज्ञ लोकप्रिय व्यक्तीमत्व अ‍ॅड. आशिष चंद्रशेखरजी बाजपायी हे महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व त्यांचे दिपस्तंभासारखे मार्गदर्शक असलेले कार्य एक विधीज्ञ म्हणून त्यांच्याकडे ज्युनिअर असलेले 30 जण न्यायाधीश झाले. ज्यात पंधरा महिला न्यायाधीश झाल्या. त्यांच्याकडे साधारणत: साडेतीनशे ज्युनिअर लोकांनी वकीली सुरू केली आहे. असं एक आगळ आणि वेगळ व्यक्तीमत्व ज्यांनी लातूर शहरात बॅडमिंटनची नेत्रदिपक प्रगती घडविली. त्यांचा परिचय देत असताना जाती पातीच्या पल्याआड व फार मोठा राजकीय वारसा असताना सुद्धा त्याचा फायदा किंवा गैरफायदा न घेता त्यांच कार्य सर्वांसमोर ठेवावं या भुमिकेतून व वर्तमान पत्रातून वेगवेगळे विषय व मार्गदर्शक व्यक्तीमत्वाचा परिचय व्हावा म्हणून ही जाणीवपुर्वक मुलाखत प्रकाशित करत आहोत. मुलाखतीचा विषय होता. अ‍ॅड. आशिष बाजपयी हे महाराष्ट्राच्या बँडमिंटन असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. पण जसजशी त्यांची मुलाखत घेत असताना जी माहिती मिळाली ती अधिकात अधिक लोकांपर्यंत पोहोचवावी असं वाटते. अ‍ॅड. आशिष बाजपायी यांचे वडील चंद्रशेखरदादा बाजपेयी ज्यांच्या समाजाची शंभर मते नसताना सुद्धा त्यांनी लातूरचे पहिले आमदार, प्रथम नगराध्यक्ष, पहिले मार्केट कमेटी सभापती, दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव व लातूरच्या राजकारणाला दिशा देणारे म्हणून परिचीत होते. पण हा राजकीय वारसा असताना सुद्धा ऍड. आशिष बाजपायी यांनी राजस्थान शिक्षण संस्था, लातूर येथील एसएमआर स्विमींग टँक तसेच वेगवेळ्या माध्यमातून जे काम केले आहे. ते आभाळा एवढ्या उंचीचे व इतरांना मोठे करत करत आपण मोठे होणारे. किंवा इतरांना मोठे करणारे म्हणूनच त्यांचे कार्य आहे. महाराष्ट्राच्या बँडमिंटन असोसिएशनचे व्यवस्थापक म्हणून व लातूरात बॅडमिंटन खेळाचे खेळाडू निर्माण करत असताना आशिष बाजपायी म्हणाले की, क्रिडा शिक्षक काय करतात, किती खेळाच्या मैदानावर मुले असतात, किती क्रिडा शिक्षकांना खेळ खेळता येतो यासह धक्कादायक आश्‍चर्यचकीत करणारी तेवढीच प्रेरणा देणारी त्यांची मुलाखत वाटली. म्हणून आम्ही ती वाचकापर्यंत पोहोचत आहोत.  संपादक

आशिष चंद्रशेखर बाजपायी यांचा जन्म 10 डिसेंबर 1956 ला झाला. त्यांच्या आईचे नाव मनोरमा त्यांचे प्राथमिक शिक्षण शाळेत झालं. चौथीपर्यंत शिक्षण व्यंकटेश शाळा त्यानंतर राजस्थान शाळा, दयानंद कॉमर्स कॉलेज व 1980 मध्ये ते लॉ पदवीधर झाले. शालेय जीवपासूनच ते खेळात रमायचे. अगोदर खो-खो चा खेळ ते रणवीर क्रिडा मंडळाच्या वतीेने खेळायचे. टेबल टेनिस जिल्हास्तीय खेळाडू होते. हॉकी, बॅडमिटन या खेळात सहभागी व्हायचे. 

अ‍ॅड. आशिष बाजपायी यांचे चुलते ऍड. भारतलाल बाजपायी व त्यावेळेसचे उपजिल्हाधिकारी यावेळा ते बॅटमिंटन खेळायचे आणि त्याच काळात बॅॅडमिंटन खेळाकडे मी वळलो. आमच्या वेळेत लातूरचे माजी नगराध्यक्ष, लातूर अर्बन बँकेचे चेअरमन प्रदिप राठी व दयानंद कॉमर्सचे क्रिडा शिक्षक भारत चामले हे बॅडमिंटनचे चॅम्पियन होते. प्रदिप राठी हे बॅडमिंटनचे विनर होते. 

जीता शहा यांचा खेळ फारच उल्लेखनीय 
त्या काळात लातूर येथे कंचगार हे अधिकारी होते. हे डालडा फॅक्टरीत अधिकारी होते. त्यांच्या कन्या जीता शहा यांच्या बरोबर बॅडमिटन खेळायचो. हा खेळ चामले सरांनी पाहिला आणि मला म्हणाले अरे आशिष काय खेळतो मग चामले सर मैदानात उतरले पण जीता शहा यांनी चामले सरांना हरवलं. कारण त्या एक्सपर्ट खेळाडू होत्या. आणि संपुर्ण लातूर शहरात जीता लहरीकांत शहा यांनी भरत चामले यांना हरवल्याची चर्चा होती. 

मला सगळेच खेळ येत होते. क्रिकेट, हॉकी, खो-खो, लाँन टेनिस हे मी खेळायचं. मी राजकारणात रमलो नाही. मी 1978 ला युवक काँग्रेसचा पदाधिकारी होतो. पण पुढे मी राजकाणात राहिलो नाही. 1972 ला मला डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला होता. दोन वेळा अंतरविद्यापीठ प्रतिनिधीत्व केले. 1977 ला राजस्थानमधील जोधपूर तर 78 मध्ये मध्यप्रदेशातील जबलपूर येथे मी खेळलो. त्यावेळा लातूर येथे बॅडमिंटनचे वातावरण व सुविधा नव्हत्या. टाऊन हॉलमध्ये मी प्रॅक्टीस करायचो. त्यावेळा मराठवाडा विद्यापीठात मी तेव्हा खेळायला जायचो तेव्हा मेडीकल कॉलेज व इंजिनिअरींगची मुले हे सतत असायची. 

1977 ला स्थापना 
आम्ही 1977 मध्ये उस्मानाबाद बॅडमिंटन असोसिएशनची स्थापना केली. ओएसएम 7/77 हा रजिस्ट्रेशन नंबर आम्ही पहिल्यांदा सातारा येथे बॅडमिंटन खेळण्यासाठी गेलो. डॉ. सतीश देशमुख, डॉ. संजय देशमुख, प्रा.रेड्डी हे होते. माझा त्यावेळा पहिला सामना आंतरराष्ट्रीयखेळाडू उदय पवार यांच्या बरोबर झाला. मी हारलो पण मी निर्धार केला जिंकण्याचा. लातूर बॅडमिंटन कोर्टची उंची कमी होती. आणि त्यावेळा स्व.माणिकराव सोनवणे नगराध्यक्ष होते. जेव्हा लातूर जिल्हा झाला. त्यावेळा तत्कालीन जिल्हाधिकारी शहजादा हुसेन यांनी बॅडमिंटन खेळाला प्रोत्साहन दिले. जिल्हाधिकारी शहजादा हूसेन व एनसीसीचे मेजर तांदळे हे बॅडमिंटन खेळायचे. त्या काळात तीन वर्षात बॅडमिंटन कोर्ट उभारण्यात आलं. उडन फ्लोरिंग केलं गेलं. त्यानंतर जिल्हाधिकारी उमेशचंद्र सरंगी लातूरला आले. 1987 मध्ये राज्यस्तरीय बॅडमिंटन चॅम्पियन स्पर्धा लातूरला घेतल्या. आणि त्यावेळेस जिल्हाधिकारी सरंगी यांनी आम्हाला स्पर्धेसाठी कमी पडलेले 35 हजार रूपये एक जणाला उसने द्यायला लावले. ते आम्ही दोन दिवसात परत केले. 

टाईम्स ऑफ इंडियात बातमी आली 
टाईम्स ऑफ इंडियाचे पत्रकार जॉन कॉस्टो हे लातूरला आले. त्यांनी एक लेख लिहीला आणि तो टाईप करून टेलिग्राम केला. आणि तो लेख टाईम्स ऑफ इंडियामध्ये छापून आला. हेडींग मराठवाड्यातील मृगजळ असं होतं. हा लेख माझे मुंबईचे सासरे डॉ. सदानंद दिक्षीत यांनी वाचुन मला फोन केला आणि येणार्‍या काळात आम्हाला अनेकांनी सहकार्य केलं. याच काळात पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मोरे यांनी बॅडमिंटन कोर्ट उभा केले. त्याच काळात नंदु नाटेकर यांना आम्ही लातूरला आणले. व एस.पी.पटनायक, जिल्हाधिकारी हूसेन यांनी भरपूर सहकार्य केलं. आज लातूरात 24 बॅडमिंटन कोर्ट आहेत. 

लातूरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्विमींग टँक 
माहिती सांगत असताना आशिष बाजपायी यांनी लातूरच्या स्विमींग टँकची माहिती दिली. व म्हणाले की, आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्विमींग टँक संत तुकाराम इंग्लिश स्कुलमध्ये होत आहे. भारतात फक्त दोन ठिकाणीच कव्हर स्विमींग टँक आहे. तशा प्रकारचा स्विमींग टँक लातूर येथे डॉ. गोपाळराव पाटील व डॉ. देशमुख यांच्यामुळे पुर्ण झालेला आहे. याचाही मला सार्थ अभिमान वाटतो. 

मास्टर भगवानचा शो घेतला 
आमच्या संघटनेची अवस्था, असोसिएशनची अवस्था आर्थिक जेमतेम होती. त्यावेळा उषाकिरण थिएटरमध्ये मास्टर भगवान यांचा शो घेतला. व ऍक्टीव्हीटी सुरू केल्या. मी 1977 पासून सचिव आहे. लातूर येेथे सोळा वेळा राज्यस्तरीय बॅडमिटन सामने घेतले. रेड्डी सरांचा मुलगा भास्कर रेड्डी हा नॅशनल खेळाडू होता, असं सांगत महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन ही शिस्तप्रिय संघटना आहे. विनरला पाच गुण, रनरला चार गुण, सेमी फायनलला 3 गुण आणि कॉटर फायनलला 2 गुण दिले जातात. 

मी महाराष्ट्राच्या टिमचा मॅनेजर म्हणून गेल्या वीस वर्षापासून जबाबदारी स्विकारत आहे. वर्षभरात एक महिना मी या खेळासाठी देतो. राष्ट्रीय पंच नरेश गुंजले यांना आम्ही प्रशिक्षक म्हणून आणले आहे. 

खेळाचे वेडे पहिले कलेक्टर श्रीकांत 
माणसाच्या व्यक्तीमत्वाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, त्याची सांस्कृतीक जडण-घडण झाली पाहिजे त्याचे शरिर मजबुत असले पाहिजे आणि गेल्या चाळीस वर्षात मी पाहिले पहिला खेळाचा वेडा असलेला जिल्हाधिकारी म्हणजे जी.श्रीकांत आहेत. याचा मला सार्थ अभिमान वाटतो. कारण ते खेळाच्या वातावरण निर्मीती आणि सुविधांकडे लक्ष देतात. 

लातूरात स्पोर्टस स्कूल व्हावी 
यावेळा आशिष बाजपायी यांनी सांगितले, स्विमींग टँकचे अध्यक्ष राजकुमार मालपाणी आहेत. मी येथे सचिव आहे. आम्ही स्विमींग टँकबरोबर येथे जीम सुरू केली. जीमचे उद्घाटन दिलीपराव देशमुख यांनी केले. नंतर कार्डीओ जीम सुरू केली. त्याचे उद्घाटन पालकमंत्री संभाजीराव पाटील यांनी केल. आम्ही अधिकात अधिक खेळाडू निर्माण व्हावेत, चांगले कोच आणावेत यासाठी प्रयत्न करीत आहोत. यावर्षी आमच्या संस्थेचे खेळाडू स्विमींगसाठी गेले आहेत. चेतक खेडेकर हे नागपूरचे त्यांच्या खेळात वेगवेगळ्या खेळाचे दिडशे मुले हे नॅशनल खेळाडू आहेत. आणि खेळाला चालना देणे गरजेचं. 

पंजाबात पहिली स्पोर्ट स्कुल 
भारतात पंजाब येथे पहिली स्पोर्ट स्कुल आहे. आम्ही लातूर येथे सुरू करण्याचा संकल्प करत आहोत. लक्ष्मीरमण लाहोटी व सर्व सहकार्यानी मला त्या प्रकल्पात साथ देण्याचे मान्य केले आहे. मी दयानंद लॉ कॉलेजला पंधरा वर्ष प्राध्यापक होतो, असेही ते म्हणाले. माझ्याकडचे ज्युनिअर तीस जज झाले. त्यात पंधरा महिला आहेत, असेही त्यांनी सांगितले.आपण वयाची मर्यादा खेळात नसते हे सांगत असताना चीनचा बॅडमिंटन कोच 80 वर्ष वयाचा असल्याचे सांगितले. 

बॅडमिंटन हा श्रीमंतांचा खेळ आहे. हे म्हणणं चुकीचे कारण नाशिक येथे एका सफाई कामगाराचा मुलगा प्रज्वल सोनवणे अंडर 13 वर्ष मध्ये तो राष्ट्रीय खेळाडू आहे. ट्रेनर मकरंद देव यांचाही त्यांनी उल्लेख केला. शेवटी ऍड. आशिष बाजपायी म्हणाले की, खेळाचं प्रमाण वाढले पाहिजे, मैदाने फुलली पाहिजे यासाठी शाळा आणि कॉलेजमध्ये क्रिडा शिक्षकांनी अधिकात अधिक सक्रीय होऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे, मी एकंदरीत माझ्या जीवनात खुप खुप समाधानी आणि आनंदी आहे, असंही ते म्हणाले. या दरम्यानच्या काळात मुलाखात चालू असताना बॅडमिंटनसाठी अनेक मुले, मुली येत होती. काही पालकांसह येत होतीे. मग लाहोटी असेल, सोनी असेल अनेकांची त्यांनी ओळख करून दिली. अग्रवाल, कमलकिशोर हे ही त्यावेळेस पोहत होते.अ‍ॅड. रवि शेट्टी हे मुलाखतीच्या वेळी उपस्थित होते. आम्हाला अ‍ॅड. आशिष बाजपायी यांचा सार्थ अभिमान वाटतो. क्रिडा क्षेत्र विविध खेळ, वकील व सर्वांना साथ देत देत इतरांना मोठ करण्यात आनंद माणणारे व वृक्षारोपणाचा धाडसी कार्यक्रम शिस्त आणि स्वच्छता याचंही त्यांनी उहापोह केला.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment