लातूर :पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर ,मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यु पवार आणि युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर या त्रिकुटाने केलेल्या नियोजनामुळे लातूर येथे आयोजित अटल महा आरोग्य शिबीर न भुतो न भविष्यती अशा पद्धतीने यशस्वी झाले .एक आगळा वेगळा आणि लाखोंची उपस्थिती असतानाही शिस्तबद्ध कार्यक्रम झाला .त्यामुळे अघाडीवरील या तीन वीरांनी केलेली मेहनत फळाला आली .
सर्वसाधारणपणे आरोग्य शिबीर म्हटले की काही डॉक्टर आणि रुग्णांची गर्दी असे चित्र दिसून येते . पण हे शिबीर त्याला अपवाद होते .एक लाख ८० हजार जनता आणि रुग्ण येवुनही कसलाही गोंधळ कुठेही दिसला नाही. जवळपास एक महिन्यापासुन दिवस रात्र एक करून हे शिबीर यशस्वी व्हावे यासाठी तिघेही प्रयत्नात होते .शिबीर यशस्वी झाल्यानंर हे प्रयत्न सत्कारणी लागल्याचे सिद्ध झाले .
विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी या तिघांचेही जाहीर कौतुक केले .पालकमंत्र्यानी आग्रह करून हे शिबीर लातुरला मागून घेतले .इतर कार्यक्रमात केवळ मान्यवरांचे सत्कार केले जातात पण येथे उपस्थित डॉक्टरांचा सत्कार् करण्यात आला. अरविंद पाटील यांनी २४ तास काम करून सर्व सोयी करून घेतल्या रुग्णांच्या भोजनाची व्यवस्था सुधाकर शृंगारे यांनी केली .शिबिराचे सर्व कामकाज पाहणारे रामेश्वर नाईक यांचेही कौतुक झाले. अभिमन्यु पवार यानी अण्णा हजारे यानी नाईक यांच्या बद्दल आपले मत व्यक्त केलेली ध्वनिफित ऐकवली.
सर्वाधिक चर्चेत राहिले ते अभिमन्यु पवार .प्रत्येक वक्त्याने त्यांचा आवर्जून उल्लेख केला .आपल्या मनोगतात अभिमन्यु पवार यानी शिबिरासह लातुरसाठी उजनीच्या पाण्याची मागणी केली होती. वैद्यकीय महाविद्यालयासाठी निधी मागितला .याची दखल घेत गिरीश महाजन आणि पंकजा मुंडे यांनी पवार यांची उंची वाढविली .रेल्वे बोगीच्या कार्यक्रमातही अभिमन्यु पवार यांची चर्चा झाली होती पण या कार्यक्रमाने अभिमन्यु पवार यांचा सर्वत्र बोलबाला झाला विशेष म्हणजे स्वतः मुख्यमंत्र्यां नी त्यांचा उल्लेख माझे सहकारी असा केला .पंकजाताई मुंडे यांनी अभिमन्यु दुष्ट चक्रव्युहात अडकण्या ऐवजी लढत लढत वाटचाल करीत असल्याचे सांगितले .
या कार्यक्रमाला यशस्वी करणारे तिसरे नाव युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यानी शिबिराच्या यशस्वितेसाठी प्रयत्न करणारे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर ,अभिमन्यु पवार आणि अरविंद पाटील यांचा सत्कार केला सत्काराला नाव पुकारले असतानाही अरविंद पाटील शिबिरात रुग्णांच्या व्यवस्थेत व्यस्त होते यावरूनच त्यांची धडपड दिसुन आली. अरविंद पाटील सत्कार घेण्यासाठी व्यासपीठावर आलेत्यांनी उपस्थित मान्यवरांपैकी प्रत्येकाने एका एका कक्षाला भेट देवून पाहणी करण्याची विनंती केली .
एकंदर पालकमंत्री ,अभिमन्यु पवार आणि अतविंद पाटील यांच्या मेहनतीने अनेक रुग्णांना नवा जन्म मिळाला यामुळे भविष्यात हे शिबीर लातुरकरांच्या कायम लक्षार राहणार आहे .
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment