लातूर :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर पेक्षाही लातुरवर अधिक लक्ष आहे .त्यामुळेच लातुरच्या विकासासाठी काही कमी पडणार नाही असा विश्वास पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केला .
लातूर येथे आयोजित अटल महा आरोग्य शिबिरात मनोगत व्यक्त करताना पालकमंत्री बोलत होते . पालकमंत्री म्हणाले की देशात कोणीही उपचारापासुन वंचित राहु नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी हे शिबीर लातुरसाठी दिले .गोरगरीब जनतेला याचा फायदा होणार आहे .लातूर ही शिक्षणाची खाण आहे . देशात लातूर जिल्ह्यात सर्वाधिक डॉक्टर तयार होतात. पण या भागात वैद्यकीय सुविधा कमी आहेत .लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयास आणखी काही सोयी व सुविधा देण्याची गरज आहे. उपचारासाठी या परिसरात मोठी रुग्णालये नाहीत. त्यासाठी हे महाविद्यालय अधिक सक्षम होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले .ज्ञानाची खान असलेला लातूर जिल्हा आहे .
लातुरात यावर्षीही पाऊस कमी आहे ,मागेही दुष्काळ होता. पण मुख्यमंत्री फडणवीस यानी पाठबळ दिल्यामुळे या भागात जलयुक्त शिवारची कामे मोठ्या संख्येने झाली. इंद्रप्रस्थ जलभुमी अभियान राबवून पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना रुजवली. त्याचा मोठा फायदा झाला आहे .यातुन दुष्काळी स्थिती कमी करण्यास मदत झाली असल्याचे पालकमंत्री निलंगेकर म्हणाले .
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment