Sunday, October 7, 2018


लखनौ 
देशातून नक्षलवाद आणि माओवाद्यांची लवकरच सफाई होईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे. देशात आधी १२६ जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद फोफावला होता. पण आता १० ते १२ जिल्ह्यांमध्येच नक्षलवाद उरला आहे. सुरक्षा दलांच्या कारवाईमुळे नक्षलवादी संपत आहेत, असं राजनाथ म्हणाले. 

लखनऊजवळच्या बिजनोरमध्ये शिघ्र कृती दला (RAF)च्या २६ व्या स्थापना दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राजनाथ सिंह यांनी केंद्रीय निम लष्करी दलांच्या पराक्रमांचे कौतुक केले. केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आणि शिघ्र कृती दला (RAF)च्या धाडसी कारवायांमुळे नक्षलवाद, माओवादाची सफाई होईल आणि तो दिवस लवकरच येईल, असं राजनाथ म्हणाले.

चालू वर्षात सुरक्षा दलांनी जवळपास १३१ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले, तर १२७८ जणांना ताब्यात घेतले. याशिवाय जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा सामना करताना सीआरपीएफने कौतुकास्पद कामगिरी केल्याचे ते म्हणाले. भरकटलेल्या काही युवकांनी दहशतवादाची वाट पकडली आहे. मात्र, केंद्रीय सुरक्षा दलाकडून तितक्याच सतर्कतेने सुरक्षा हाताळली जात असल्याचे सिंह म्हणाले..

No comments:

Post a Comment