प्राचीन युगात विनितेने सर्पांची आई कद्रूचा अपमान केल्यामुळे सुडाने चवताळलेल्या कद्रूने शेष, वासुकी, अनंत या आपल्या पुत्रांना विनितेचा दला घेण्यास पाठविले. नाग व सर्पांनी विनितेला बंदिस्त करून कद्रूसमोर आणले. त्यावेळी विनितेने गरूडाचा धावाकेला. विनितेचा धावा ऐकून गरूड श्येन, संतापी, जटायूसह सर्पांना पराभूत करण्यासाठी आला. पण तो स्वतःच पराभूत झाला तेव्हा गरूड विनितेला घेऊन अदृश्य रूपज्ञाने निसटला नंतर विनितेने सर्व प्रकार कश्यपांना सादर केला. काश्यप तिला म्हणाले तू घाबरू तू जे अंडे घालशील ते अंडे साक्षात गजानन येऊन फोडील व त्या अंड्यातून एक पक्षी बाहेर येईल व तयाच्या गर्जनेने व त्याच्या गर्जनेने सारे पराभूत होतील.
विनितेला धीर आला काही दिवसांनीतिने अंडे उपजविले व ती त्या अंड्याची काळजी घेऊ लागली. तोच एक घटना घडली एक दैत्य अक्राळ-विक्राळ पशूच्या रूपाने येऊन मुलांवर चाल केली. परंतू गणेशाने त्याचा पाशाने जीव घेतला. ही घटना घडली तोपर्यंत विनिता अंड्यांचे संगोपन करीत होती. तिचे दुर्लक्ष झालेले पाहून ते अंडे मातीतून उकरून काढले व गणेशाने फोडले. त्या बरोबर त्या अंड्यातून अजस्त्र पक्षी निर्माण झाला व त्याने गणेशावर उडी मारली. त्याच क्षणी गणेशाने अंकूश फेकून मारला. त्याचा उपयोग झाला नाही, मग गणेश युक्ती करून त्या पक्षावर बसला.
विनिताला कश्यपाने सांगितलेल्या भाकिताची आठवण झाली व गणेशाला नमस्कार करून तिने त्याची स्तुती केली. नंतर ती गणेशाला म्हणाली, हे गजानना, तू या पक्षाला अभयदान दे व याचे मयूर नाव ठेवून तुझ्या नावापुढे याच्याही नावाचा लोक उच्चार करतील असे वरदान दे. गणेशाने विनितेच्या शब्दाला होकार दिला व म्हणाला, आजपासून मी मयुरेश्वर हे नाव धारण करीन. त्या वेळेपासून गणेशाला मुयरेश्वर या नावाने लोक ओळखू लागले अशी मयुरेश्वर नावाची आख्यायिका आहे.

No comments:
Post a Comment