जालना : जिल्ह्यात वाढलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. दरम्यान, दरोडेखाेराचा दरवाजा ठोकताच आतून दरोडेखोर असलेल्या बाप-लेकांनी लोखंडी हातोडा, कोयत्याने पोलिसांवर हल्ला केला. परंतु, प्रसंगावधान असलेल्या पीआय गौर यांनी दरवाजासमोर उभे असलेले एपीआय परदेशी यांना बाजूला ढकलल्यामुळे त्यांचा प्राण वाचल्याची घटना सोमवारी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास शिकलकरी मोहल्ला भागात घडली. तेजसिंग नरसिंग बावरी, नरसिंग बावरी अशी अटक करण्यात आलेल्या बाप-लेकांची नावे आहेत.
या मोहिमेदरम्यान शहरातील दरोडे, चोऱ्या, घरफोड्या आदी गंभीर गुन्ह्यातील फरार कुख्यात आरोपी तेजासिंग बावरी हा त्याच्या शिकलकरी मोहल्ल्यातील घरी आल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे एलसीबीचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर हे मोठ्या फौजफाट्यासह रात्री १२.३० वा. आरोपीच्या घरी जाऊन ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू होता. दरम्यान, पथकातील पोलिस उपनिरीक्षक जयसिंग परदेशी यांनी आरोपीच्या घराचा दरवाजा ठोठावला असता, घरातून तेजासिंग बावरी याने हातात हातोडा घेऊन परदेशी यांच्या अंगावर चालून आला.
परदेशी यांच्या डोक्यावर तेजासिंग बावरी हा हातोडा मारणार तेवढ्यातच पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी वेळीच परदेशी यांना बाजूला ढकलले. यामुळे पुढील दुर्घटना टळली. या वेळी तेजासिंगचा बाप नरसिंग बावरी हादेखील पोलिसांवर हातात कोयता घेऊन चालून आला.
या वेळी बावरी पितापुत्रांना पोलिसांनी बळाचा वापर करून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सादर बाजार ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला. ही मोहीम स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, पोलिस उपनिरीक्षक जयसिंग परदेशी, पोलिस हेड कॉन्स्टेबल कुरेवाड, देशमुख, बगाटे, हजारे, किरण मोरे आदींनी पार पाडली.
No comments:
Post a Comment