तर शिवसेनेच्या स्टाइलने आंदोलन करु - आदित्य ठाकरे

Thursday, January 17, 2019

नांदेड । कर्जमाफीच्या नावावर बँकेकडून होणारी अडवणूक तसेच शेतकऱ्यांना मिळणारी अपमानास्पद वागणूकीबद्दल सुरुवातीला यादी घेऊन बँकेच्या अधिकाऱ्यांना समजावून सांगू. त्यानंतरही ऐकले नाही तर शिवसेनेच्या स्टाइलने आंदोलन करु, असा खणखणीत इशारा युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुधवारी दिला.

नांदेड जिल्ह्यातील मरळक, खडकी, निळा याठिकाणी त्यांनी बुधवारी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांची व्यथा मात्र कायमच आहे. हे प्रश्न का सुटले नाहीत, याबाबत आमचे सरकारशी भांडण सुरु आहे. 

कर्जमाफीचा प्रश्न असो, पीक विम्याचा प्रश्न, बी - बियाणे, अवजारांचा प्रश्न, पाणीटंचाईचा प्रश्न असो, या सर्वांबाबत सरकारी यंत्रणेने दाखवलेली उदासीनता ही चिंतेची बाब आहे. कर्जमाफीची सगळीच गुंतागुंत आहे. सरकार म्हणते कर्जमाफी झाली. प्रमाणपत्रही काही जणांना मिळाली असे ठाकरे म्हणाले.

No comments:

Post a Comment