चुलत भावांच्या मारहाणीत एकाचा मृत्यू

Friday, January 18, 2019

लातूर : शेतीच्या वादातून लातूर मधील खड्गाव येथील एक तरुणाला चुलत भवानी रात्री साडे आकराच्या सुमारास बेदम मारहाण केली. त्याला उपचारा साठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु गुरुवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला 

शेती वाटणी आणि सामायिक विहीर या कारणांनी जनार्धन साठे व त्यांच्या भावात वाद झाला जनार्धच्या मुलगा आकाश ने  आपल्या चुलत्याच्या शेतातील वीजपुरवठा बंद केला त्याचा राग धरून बुधवारी रात्री आकाश ला त्याच्या चुलत भावाने एकट्याला गाठून जबर मारहाण केली रात्रीच रटाळ दवाखान्यात दाखल करण्यात आले पण पहाटे उपचार दरम्यान त्याचे निधन झाले 

तत्पूर्वी त्याने दिलेल्या मृत्युपूर्व जबाबावरून पोलिसांनी विलास साठे, गोपाळ साठे, अश्विन साठे, सचिन साठे, सोमनाथ साठे, दीपक साठे आणि अमोल साठे या ७ जणांना अटक केली आहे. 

No comments:

Post a Comment