पूर्वी केवळ तपासून रुग्ण परीक्षा केली जायची. त्यानुसारच औषधोपचार केले जायचे. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. हल्ली चेकअपचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. एका सर्वेक्षणानुसार वाढत्या उत्पन्न गटातील पंचवीस कोटीहून अधिक लोक चार ते आठ हजार रुपये खर्चून व्यवस्थित चेकअप करून घेण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे पॅथॉलॉजी, सोनोग्राफी, रेडिओलॉजी या क्षेत्रातल्या तज्ज्ञांबरोबरच टेक्निशियन्सलाही बराच वाव आहे. महाराष्ट्रातल्या अनेक संस्थांमध्ये बी.एससी.नंतर डी.एम.एल.टी हा लॅब टेक्नॉलॉजीचा कोर्स उपलब्ध आहे. या डिप्लोमाधारकांना स्वत:ची लॅब सुरू करता येते अथवा डायग्नोस्टिक सेंटरमध्ये नोकरीही मिळू शकते.
भारतामधील हेल्थ इंडस्ट्री वेगाने विस्तारत आहे. मेडिकल टुरिझममुळे देशातील आरोग्य सेवेचा विस्तार आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. या क्षेत्रातील विविध शाखाही नव्याने विस्तार पावत आहेत. योगा, फिटनेस, वेलनेस, बायोमेडिकल, काऊन्सिलिंग, फार्मसी, हॉस्पिटल मॅनेजमेंट, मेडिकल सोशल वर्कर या नव्या शाखांमध्येही करिअरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळेच विद्याथ्र्याने या सर्व शाखांकडे करिअरचा उत्तम पर्याय म्हणून पाहायला हवे. बारावीमध्ये 'पीसीबी' घेतल्यांना सीईटी देऊन त्यानुसार अॅलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद अशा अनेक शाखांना प्रवेश घेऊन मेडिकल ग्रॅज्युएशन करता येतं. पण काही कारणाने मेडिकलला जाणं शक्य नसल्यास या अन्य पर्यायाचा विचार करता येतो. हेल्थ केअर क्षेत्रामध्ये 'डायग्नोस्टिक स्व्हिहसेस'ला भरपूर महत्त्व येत असल्याचे दिसत आहे.
मोठमोठ्या मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये क्लिनिकल ट्रायल्स घेतल्या जातात. भारतात हा कारभारही मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे. त्यामुळे फार्मसी क्षेत्रातही बराच मोठा वाव आहे. दहावीनंतर डिप्लोमा इन फार्मसी, बारावी सायन्सनंतर बी.फार्म आणि बी.एससी., बी.फार्म.नंतर एम.फार्म., पीएचडी असे अनेक पर्याय या क्षेत्रात उपलब्ध आहेत. भारतात मेडिकल टुरिझम हे क्षेत्रही वेगाने विस्तारत आहे. बिलिंग स्व्हिहसेस, हेल्थ इन्शुरन्स क्लेम प्रोसेसिंग यासारखी पॅरामेडिकल कामे अमेरिका आणि इंग्लंडसारख्या देशातून आशियाई देशांमध्ये आऊटसोर्स केली जातात. त्याचप्रमाणे मेडिकल टुरिझम अंतर्गत फेसलिफ्टपासून ऑर्गन ट्रान्सप्लांटपर्यंतचे अनेक प्रकार परदेशी लोक आशियाई देशांमधून करून घेणे फायदेशीर मानतात.
अमेरिकेत ज्या प्रकारच्या सर्जरीला तीस हजार डॉलरहून अधिक खर्च येतो, तीच सर्जरी भारतात अवघ्या पाच हजार डॉलरमध्ये केली जाते. त्यामुळे रहाणे, खाणे-पिणे, फिरणे हा खर्च गृहित धरूनही भारतामध्ये अशा सर्जरी करून घेणे परवडते. म्हणूनच मेडिकल टुरिझम या क्षेत्रात भारत ड्रीम डेस्टिनेशन बनत आहे. ट्रॅव्हल एजन्सी, मार्केटिंग कंपन्या, हॉस्पिटल्स यांच्या परस्पर सहकार्याने मेडिकल टुरिझम क्षेत्र झपाट्याने विस्तारत आहे. युवकांनी याचा आवश्य विचार करावा. .

No comments:
Post a Comment