- सद्यस्थितीत केवळ पुस्तकी किडा असणं किंवा विविध पदव्या हाताशी असणं यातून कारकीर्दीतील उत्तम यशाबाबत आशा बाळगता येत नाही. याच्या जोडीला त्या त्या क्षेत्रात विशेष कौशल्य मिळवायला हवं. स्वत:च्या अंगी कोणत्या प्रतिभा आहेत आणि त्यांचा कारकीर्दीच्या क्षेत्रात कसा वापर करता येईल, याचाही विचार करणं गरजेचं ठरतं..
- उत्तम कारकीर्दीसाठी पुरेशा योग्यतेबरोबरच आत्मविश्वास असणंही महत्त्वाचं आहे. आत्मविश्वासाच्या बळावर तुम्ही अर्धी लढाई जिंकू शकता, हे लक्षात घ्यायला हवं. अभ्यासासोबत अंगभूत कला-गुणांचा विकासाला योग्य वाव दिला तर त्यातूनही आत्मविश्वास वाढण्यास मदत होते..
- सध्याचं युग माहिती-तंत्रज्ञानाचं आहे. त्यामुळे तुमच्याकडे जितकी अधिक माहिती असेल, तेवढी कारकीर्दीची वाट सुकर ठरणार आहे. अधिकाधिक लोकांना भेटणं, त्यांच्याशी संवाद साधणं, महत्त्वाच्या माहितीची देवाण-घेवाण करणं याही बाबी यशस्वी कारकीर्दीसाठी महत्त्वाचा आधार ठरतात. .
- आजकाल विविध क्षेत्रांत प्रगत तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा ठरत आहे. साहजिक कारकीर्दीला सुरुवात करताना तुम्हालाही प्रगत तंत्रज्ञान अवगत असायला हवं. संगणकाची माहिती असणं तर अनिवार्य आहेच, शिवाय त्यातील काही नव्या तंत्रज्ञानाची माहिती असणंही महत्त्वाचं आहे..
- कारकीर्दीच्या धावपळीत वा चिंतेत कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असल्याचं अनेकांबाबत पाहायला मिळतं. मात्र अडचणीच्या काळात कुटुंबच आपल्या पाठीशी ठामपणे उभं राहत असतं. त्यामुळे कारकीर्दीच्या व्यस्ततेतूनही कुटुंबासाठी पुरेसा वेळ द्यायला हवा. कुटुंबात सदस्यांमध्ये सुसंवाद असेल तर कारकीर्दीची वाट तणावमुक्त राहू शकते..
- तुमच्या वैयक्तिक चिंता, वैयक्तिक पातळीवरील संघर्ष या व्यक्तिगत बाबी ठरतात. त्यामुळे या बाबी कारकीर्दीवर परिणाम करणाऱ्या ठरणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी. वैयक्तिक दु:ख, चिंता बाजूला ठेवून आपापल्या क्षेत्रात इतरांच्या बरोबरीनं काम करण्याकडे लक्ष द्यावं. टीमवर्क हा यशस्वी कारकीर्दीचा महत्त्वाचा मंत्र ठरतो. त्यामुळे सहकाऱ्यांशी वेळोेवेळी संवाद साधणं, त्यांचं म्हणणं ऐकून घेणं, त्यांच्या उत्तम कल्पनांना, प्रयत्नांना दाद देणं याही बाबी गरजेच्या ठरतात..
- आपापल्या क्षेत्रात यशस्वी व्हायचं तर महत्त्वाकांक्षी असायला हवं. परंतु अतिमहत्त्वाकांक्षा हानीकारक ठरते, हे लक्षात घ्या. त्यामुळे आत्मविश्वास बाळगताना अंगी पुरेशी विनम्रता असणंही गरजेचं ठरतं. आयुष्यभर शिकत राहण्याचा मंत्र कायम लक्षात ठेवायला हवा. .
Saturday, September 1, 2018September 01, 2018
आजकाल विविध क्षेत्रात स्पर्धा वाढीस लागली आहे. स्पर्धा परीक्षांचं प्रमाणही वाढलं आहे. अशा परिस्थितीत आवडीच्या क्षेत्रात कारकीर्दीची संधी प्राप्त होणं कठीण ठरत आहे. मुख्यत्वे पूर्वीसारखं आता केवळ एखाद्या विषयातील पदवी घेतली की झालं, असं चित्र राहिलेलं नाही. जगात विविध क्षेत्रात वेगानं बदल होत आहेत, अनेक नवनवीन बाबी समोर येत आहेत. साहजिक विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांकडूनही अपेक्षा वाढीस लागल्या आहेत. त्यामुळे त्या त्या क्षेत्रातील बदलांबाबत सतत सजग राहणं, एवढंच नाही तर येत्या काळात आणखी काय बदल होऊ शकतात, याचा विचार होणं गरजेचं ठरत आहे. या पार्श्वभूमीवर उत्तम कारकीर्दीसाठी काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घेतल्या जायला हव्यात..
यशस्वी कारकीर्दीसाठी हे करा
By Marathwada Neta
Saturday, September 1, 2018
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment