दिल्ली :आयुष्यभर धर्म प्रसाराचे कार्य करणारे ,कडव्या विचारांचे म्हणून प्रसिद्ध असणारे जैन समाजाचे राष्ट्रसंत तरूण सागर महाराज यांनी शनिवारी पूर्व दिल्लीतील कृष्णा नगर येथील राधापुरी जैन मंदिरात अखेरचा श्वास घेतलामृत्युसमयी त्यांचे वय ५२ वर्ष होते .तरूण सागर महाराज यांना कावीळ झाला होता .
त्यावरील उपचारासाठी दिल्लीमधील मॅक्स रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. मागील वीस दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. महाराजांना अशक्तपणा आला होता . प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने महाराजानी मृत्यू समीप आल्याचे जाणून अन्नपाण्याचा त्याग करणारे संथारा व्रत करण्याचा निर्णय घेतला होता .त्यासाठी आपल्याला चातुर्मास स्थळी घेवून जावे अशी इच्छा आहे त्यांनी व्यक्त केली .त्यानुसार महाराजांना पूर्व दिल्लीतील राधापुरी जैन मंदिरात नेण्यात आले होते .तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला .तरुण सागर महाराजांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याची वार्ता देशभरात पसरल्यानंतर त्यांचे अनुयायी प्रार्थना करत होते. परंतु या प्रार्थनेला यश आले नाही .शनिवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली .दुपारी तीन वाजता तरूण सागर महाराज त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले .
कोण होते तरूण सागर महाराज
तरुण सागर महाराजांचे मूळ नाव पवन कुमार जैन असे होते .26 जून 1967 रोजी मध्यप्रदेशातील गुहजी गावात त्यांचा जन्म झाला होता. महाराजांच्या आईचे नाव शांतीबाई तर वडिलांचे नाव प्रताप चंद्र असे आहे .8 मार्च 1981 रोजी गृहत्याग करून महाराजांनी छत्तीसगडमध्ये दीक्षा घेतली .मध्य प्रदेश आणि हरियाणा विधानसभेत त्यांनी प्रवचने केली होती. यावरून वादही निर्माण झाला होता .मध्यप्रदेश सरकारने 6 फेब्रुवारी 2002 रोजी त्यांना राजकीय अतिथींचा दर्जा दिला होता.
No comments:
Post a Comment