प्रकाश आंबेडकर-ओवेसी एकत्र

Sunday, September 16, 2018

औरंगाबाद : देशात लोकशाही धोक्यात आल्याचा आरोप करत ॲड. प्रकाश आंबेडकर व असदुद्दीन ओवेसी एकत्र आले असून 'जय भीम', 'जय मीम'चा नारा दिला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. २ ऑक्टोबरला औरंगाबादेत दोन्ही पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती माजी आमदार हरिदास भदे व एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली..

देशाच्या स्वातंत्र्यापासून बहुजन समाज, मुस्लिम समाज व ओबीसी समाजाकडे दुर्लक्ष झाले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, सेना-भाजपा पक्षांनी आतापर्यंत मते मिळवण्यासाठी फक्त त्यांचा वापर करून घेतला. मात्र आता हा समाज जागरूक झाला आहे.

 या वृत्तीच्या समूळ नायनाटासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला व लोकशाहीला मानणाऱ्या पक्षांना एकत्र घेऊन आम्ही एकत्र लढा उभारणार आहोत.ॲड. प्रकाश आंबेडकर यांची ऑल इंडिया वंचित बहुजन आघाडी व भारिप-बहुजन महासंघ आणि असदुद्दीन ओवेसी यांची एमआयएम २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी एकत्र आली आहे. 

No comments:

Post a Comment