इजिप्त व भारतादरम्यान नवा करार

Sunday, September 16, 2018


नवी दिल्ली : इजिप्त व भारत यांच्यामध्ये कृषीतंत्र देवाणघेवाणीबाबत एक परस्पर सामंजस्य करार करण्यास मंत्रिगटाने मान्यता दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला गेला. त्यामुळे परस्परांच्या सहकार्य करण्याच्या क्षेत्रात खासकरून गहू व मका उत्पादनामध्ये कृषीजैव, प्रौद्योगिकी, नॅनो तंत्रज्ञान, जलसंरक्षण व सूक्ष्म सिंचन, जलव्यवस्थापन, ऊर्जा उत्पादन आदींसाठी काम केले जाणार आहे. दोन्ही देशांमध्ये या अनुषंगाने कृषी संबंधातील विविध क्षेत्रात सहकार्य करता येणे शक्य होणार आहे.

 यामध्ये खाद्यसंरक्षण, सुरक्षितता, गुणवत्ता, बागायती, जैविक शेती, पशुपालन, डेअरी उत्पादन, मत्स्यपालन, चारा उत्पादन, शेतीची अन्य उत्पादने, मल्यवर्धन, पशुसंलग्न उत्पादने व स्वच्छता, शेतीची अवजारे आदी विविध क्षेत्रांचा समावेश आहे. या समझोत्यानुसार कृषी व्यवस्थापन, विपणन, कापणीपूर्वीच्या व नंतरच्या विविध प्रक्रिया, कीटक व्यवस्थापन, बियाणी आदी क्षेत्रांमध्येही परस्परांच्या देवाणघेवाणीला महत्त्व देण्यात येणार आहे. दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय चर्चा हादेखील महत्त्वाचा भाग असणार आहे.

 त्यानुसार सुरुवातीच्या दोन वर्षांच्या काळात दोन्ही देशांच्या संयुक्त कार्यगटाची बैठक घेतली जाणार आहे. वर्षातून किमान एक बैठक दोन्ही देशांमध्ये घेण्याचा यात प्रस्ताव आहे..

No comments:

Post a Comment