रेणापूर / प्रतिनिधी
दिलीपरावजी देशमुख म्हणाले, हा सत्कार माझा नाही. तुमच्या सर्वांच्या विश्वासाचा आहे. मी एक शेतकरी म्हणून तुम्ही मला संधी दिली. मी काम केेलं, आणि तुमच्या तीस वर्ष सेवेचा हा सत्कार आहे, असं सांगून सत्काराला उतर देताना दिलीपरावजी देशमुख म्हणाले की, आज या ठिकाणी सहकाराची मोट रोवलेल्या विखे पाटलांच्या हस्ते हा सत्कार होत आहे. याचा मला आनंद आहे. तुम्ही सातत्यानी मला सहकार्य केले. आशिर्वाद दिले. जिल्हा बॅकेवर आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली. अडथळे आणले नाहीत म्हणून मी काम करू शकलो, असं सांगून दिलीपरावजी देशमुख म्हणाले की, शिवराज पाटील चाकूरकर, विलासरावजी देशमुख, शिवाजीराव पाटील निलंगेकर, बाळासाहेब जाधव यांनी मला जिल्हा बॅंकेच्या चेअरमन पदावर बसविले. आणि घराघरापर्यंत सहकार पोहोचविला.
हो हो मी परिवार वाद करतोय
दिलीपरावजी देशमुख म्हणाले की, मी परिवार वाद करतोय, मला त्याचा आनंद वाटतोय कारण पन्नास ते साठ हजार कुटूंबासह प्रपंच उभा रहावा म्हणून मी काम करतोय. आम्ही कधीही ऊस आणताना राजकारण केलं नाही. राजकारण फक्त निवडणुकीपुरतं असतं. आम्ही विचाराचे, उंचीचे आर्थिक परिवर्तनाचे काम केेलं हे सांगून आम्ही शेती, शेतकरी केंद्र बिंदु मानुन काम करतो.
आमच्यात स्पर्धा आहे विकासाची
दिलीपरावजी देशमुख म्हणाले की, होय आमच्या स्पर्धा आहे. लोकांच्या हिताची, लोकांच्या कल्याणाची आम्ही सतेची स्पर्धा करत नाहीत. तर सेवेची स्पर्धा करतोत. समाज सुखी, समाधानी असावा ही आमची भुमिका आहे. आणि आमच्यात विकासासाठी स्पर्धा आहे.
जिल्हा बॅंक कल्पवृक्ष
कल्पवृक्षाची कथा सांगताना दिलीपरावजी म्हणाले जिल्हा बॅंक म्हणजे शेतकऱ्यांचा कल्पवृक्ष आहे. तुम्ही फक्त मागण मागा जिल्हा बॅंक पुर्ण करते. त्या उलट किती किलोमीटर रस्ता त्यापेक्षा खड्डामुक्त रस्ता झाला का. शेतकऱ्यांना भाव नाही शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही. पण व्यापाऱ्याला जेल मध्ये घालतो म्हणता हे भयानक आहे, हे सांगत दुकानाची प्रगती कशी होते. मुनीम इमानदार असेल तर जर मुनीमनच अर्धा गल्ला खिशात टाकणार असेल तर प्रगती कशी होणार असं सांगून रेणाने भाव देताना ओव्हरड्राफ्ट घेऊन दिला नाही. सात मजली बॅंक हा कल्पवृक्ष आहे, असं सांगून दिलीपराव देशमुख म्हणाले मांजरा कारखान्याने गेल्या वर्षी साडेसात कोटी रूपये इन्कम टॅक्स भरला.
आप सरकार को भी बदलना होगा
दिलीपरावजी देशमुख म्हणाले की, आप सरकारकोही बदलना होगा. कारण त्यांनी आपल्याला फसवलं. आपण विश्वास टाकला त्यांनी विश्वास घात केला. आता आपल्याला सरकारकोही बदलना पडेगा. आणि अच्छे दिन कॉंग्रेसचे आणु शकतं. असं सांगून दिलीपरावजी देशमुख म्हणाले. भारताचा शेतकरी अडाणी नाही. जुन ते सोनं म्हणून आपल्याला येणाऱ्या काळात कॉंग्रेसला समर्थन द्यावे लागणार आहे.
शाबासकीची थाप गरजेची
स्व.यशवंतराव चव्हाण यांची आठवण काढून दिलीपरावजी देशमुख म्हणाले, यशवंतरावजी सांगायचे. घोड्यावर बसून आपण गावोगावी जातो. फिरतो, घोड्याची खुगीर काढून जेव्हा पाठीवर थाप मारली जाते तेव्हा त्याची अंग थरथरून येतं तसं तुमचीही शाबासकीची थाप म्हणजे तुमचे प्रश्न पाठीवर घेऊन पुढे भरारी घेण्यासाठी मला या सत्कारातून प्रेरणा मिळत आहे, असंही ते म्हणाले.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment