दिलीपरावजी म्हणजे म्हणजे चाकुरकर, निंलंगेकर आणि विलासरावांचा समन्वय : माजी मंत्री आ.बसवराज पाटील

Friday, September 14, 2018


रेणापूर / प्रतिनिधी 
दिलीपरावजी देशमुख म्हणजेे शिवराज पाटील चाकूरकर, शिवाजीराव पाटील निलंगेकर व विलासरावजी देशमुख यांचा समन्वय आहे. दिलीपरावांचा सत्कार म्हणजे चांगल्या कामाचा, चांगल्या नेतृत्वाचा, चांगल्या समाजाचा हा सन्मान आहे. 

आ. बसवराज पाटील म्हणाले की, हे काम सोपं नाही. त्यांनी जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला. सहकाऱ्यांची प्रतिष्ठा वाढविली. चांगली माणसं शोधून सापडत नसतात. चांगल्या विचाराचं समर्थन करण्यासाठी आम्ही इथं आलोय. मला मनापासून आनंद होतोय, दिलीपराव देशमुख हे महाराष्ट्रातील परिचित नेतृत्व आहे. साखर कारखानदारी व सहकारी चळवळीत त्यांचे फार मोठे योगदान आहे. नेतृत्व एका दिवसात तयार होत नसतं. यासाठी चिंतन करावं लागत. विचार करावा लागतो. तपश्चर्या करावी लागते. आणि त्याला समर्थन द्यावं लागतं, असही यावेळा बसवराज पाटील म्हणाले. 

आम्ही टोप्या घालणारे नाही 
यावेळा जि.प.चे माजी अध्यक्ष अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले की, आम्ही टोप्या घालणारे नाहीत. भाजपच्या केद्रातील आणि राज्यातील सरकारने नोटबंदी, जीएसटी च्या माध्यमातून आर्थिक स्थिती बिघडली आणि लातूरकरांना कॉंग्रेसशिवाय पर्याय नाही, असं मत व्यक्त करून अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले की, तुमच्या काठाखाली चाललयं काय असे म्हणून पालकमंत्र्यांवर टिका केली. 

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी व्हावी हिच जनतेची इच्छा आहे, असं सांगून माजी आमदार व राष्ट्रवादी कॉंगे्रसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील म्हणाले की, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी व्हावी ही लोकांची इच्छा आहे. विलासराव, दिलीपराव यांच्या नेतृत्वात जिल्हा बॅंकेने, जिल्हा परिषदेने खुपच चांगले काम केले. मी विखे पाटलांच्या कारखान्यावर गेलो होतो. पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावात त्यांनी साखर कारखानदारीबरोबर मेडीकल कॉलेज उभारलं. एका कार्यक्रमात बाळासाहेब भारदे म्हणाले होते की, विखे पाटील येथे स्वर्ग उभा करतील. आणि म्हणून चांगल्या व्यक्तीच्या हस्ते हा सत्कार होत आहे. तुम्ही पुढे चला आम्ही तुमच्या मागे मागे आहोत असे सांगून तुम्ही जो भाव दिला त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो, असंही यावेळा बाबासाहेब पाटील म्हणाले. 

शेती मालाला भाव दिले नाहीत म्हणून कर्जमाफी मागतो 
आपल्या अभ्यासपुर्ण भाषणात आ. त्र्यंबक भिसे म्हणाले की, शेतीमालाला भाव दिले नाहीत म्हणून कर्जमाफी मागतो असे सांगून आ.त्र्यंबक भिसे म्हणाले की, रेणापूरात बाजाराच्या मैदानावर मुख्यमंत्री विलासरावजींचा सत्कार ठेवला होता. मी कॉंग्रेसचा तालुका अध्यक्ष होतो. त्यावेळा मी मागणी केली, रेणापूर तालुक्याच्या आर्थिक प्रगतीसाठी एक साखर कारखाना उभा करावा. 

मुख्यमंत्री म्हणून साहेबांनी कारखाना करण्याचं जाहीर केलं. दिलीपराव देशमुखांनी कारखाना उभा करण्याचं विषय हातावर घेतला आणि रेणा कारखाना उभा झाला. तेव्हा रेणा साखर कारखान्याच्या ऊसाची बिज शेतकऱ्यांना मिळाले. यावेळा रेणापूर तालुक्यातील कोरेगावच्या एका शेतकऱ्याने धोतराच्या कर्त्यात पैसे ठेवले आणि हलगी वाजवत गावात साखर वाटली. मला याचा खुप आनंद वाटतो. दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वात मी आमदार झालो. विविध रस्त्यांची कामे केली. काही बॅरेजेसचे काम अर्धवट राहिले होते ते करून घेतले, असं सांगून केंद्रातील आणि राज्यातील सरकार हे घोषणा करणारं आहे. 

शेतीमालाला भाव नाही. म्हणून लोक कर्जमाफी मागतात. आपल्या सर्वांमुळे माझ्यासारखा सामान्य माणूस आमदार झाला. विलासरावजींमुळे 145 किलोमीटर पाणी थांबले. बॅरेजेस मध्ये केलेल्या जमिनीचे पेमेंट आणले आहे. सावरजा यांची गळती थांबविली, असं सांगून शेतकऱ्यांच्या 344 कोटी रूपयांच्या नुकसान भरपाईचा प्रस्ताव मंत्रालयात आहे. मुख्यमंत्र्यांना भेटलो, महसुल मंत्र्यांना भेटलो अद्याप न्याय मिळाला नाही असंही यावेळा आ. त्र्यंबक भिसे म्हणाले. या भागातील जनतेचा मी ऋणी आहे. कारण त्यांनी साथ दिली. म्हणूनच विविध योजना मी राबवु शकलो. मला पिक विम्याचं कुठल्याही बैठकीला बोलविले नव्हते. मी खोट बोलत नाही सिद्ध करा मला बैठकीला बोलविलेले. मी राजीनामा देतो. अन्यथा खोटे बोलले म्हणून पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असंही आ. त्र्यंबक नाना भिसे म्हणाले. जगाचा पोशिंदा शेतकरी सुखी रहावा हीच दिलीपराव देशमुखांची इच्छा आहे, असंही यावेळा ऍड. त्र्यंबक भिसे म्हणाले.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment