रेणापूर / प्रतिनिधी
आम्ही फक्त बोलत नाही. तर शेतकरी, कष्टकरी, शेतमजुर यांना अच्छे दिन यावेत म्हणून प्रयत्न करतो. असं सांगून माजी मंत्री आ.अमित देशमुख म्हणाले की, मांजरा परिवाराने गेल्या पाच वर्षात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार कोटी रूपये दिलेले आहेत.
महाराष्ट्राच भावी नेतृत्व
आ. अमित देशमुख म्हणाले की, राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आम्ही महाराष्ट्राचे भावी नेतृत्व म्हणून पाहतो. त्यांचे मनपुर्वक स्वागत करून आ. अमित देशमुख म्हणाले की, गेली पाच घटकं विलासरावजी देशमुख व दिलीपरावजी देशमुख यांनी राजकारण केले. ते दोघेही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभे होते. आणि लातूरकर, निलंगेकर यांनी यांना मार्गदर्शन केले. असं सांगून आ.अमित देशमुख म्हणाले की, दिलीपरावाचा सत्कार कोणाच्या हस्ते करायचा. ज्यांनी सतर वर्ष राजकारण केले त्यांच्या हस्ते म्हणजे विखे पाटलांच्या हस्ते दिलीपरावजींचा सत्कार करण्याचं ठरवलं.
भाऊ कसे असावे
भाऊ कसे असावे असा प्रश्न उपस्थित करून अमित देशमुख म्हणाले की, विलासरावजी आणि दिलीपरावजी सारखे भाऊ असावेत. आणि हाच धागा पकडून अमित देशमुख म्हणाले की, काका, पुतणे कसे असावेत तर दिलीपरावजी देशमुख आणि अमित देशमुख यांच्यासारखे असावेत. काका पुतणे कसे नसावेत तर अशोक निलंगेकर आणि संभाजीराव निलंगेकर सारखे नसावेत. आम्ही कधीही अंतर येऊ दिले नाही मला धिरजला सांगायचंय इतिहासाची पुनरावृत्ती होत असते म्हणून येणाऱ्या पिढीनं अमित देशमुख व धिरज देशमुख सारखे भाऊ असावेत, असं वागावे. दिलीपरावजी देशमुख यांनी एक कुटूंब प्रमुख म्हणून मांजरा परिवारातील शेतकऱ्यांच्या ऊसाला पाच हजार कोटी रूपये ऊसाचं बिल दिले. हे सर्व करत असताना अत्यंत चांगल्या प्रकारे काम दिलीपरावजी देशमुख करत आहेत.
हवा रुख बदल रही है
यावेळा माजी मंत्री आ. अमित देशमुख म्हणाले की, हवा रोख बदल रहा है. ज्येष्ठ पत्रकार बद्दर साहेब या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आप आये आपका स्वागत है. आप यही रहे ये मेरा कहेना है. असं सांगून आ. अमित देशमुख म्हणाले, तुम्ही आम्ही दिलीपरावजी हे गुरूबंधू आहात. आप कही न जाये हे जाहीरपणे म्हटल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात होते. आणि आपल्या स्टाईलमध्ये त्यांनी अनेक किस्से सांगितले.
क्या हुआ तेरा वादा
प्रास्ताविक भाषणात भाजप सरकारवर टिका करताना जि.प.सदस्य धिरज देशमुख म्हणाले, अच्छे दिनचे काय झालं. लोक म्हणतात मोदीजी क्या हुआ तेरा वादा यावर ते म्हणतात भुल गया सब कुछ याद नही अब कुछ असं केंद्राचे आणि राज्याचे सरकार आहे. भाजप पक्ष टिकेचे राजकारण करते. सत्ता मिळाल्यावर सुद्धा टिका म्हणून आता टिकेला उत्तर द्यायची वेळ आहे, असं सांगून धिरज देशमुख यांनी कार्यकर्त्यांच्या बळावर हा शेतकऱ्यांनी घेतलेला कार्यक्रम आहे. चिल्लर की किमत कळेल यावेळा भाषणात धिरज देशमुख म्हणाले, नोटा वाऱ्याने उडतात. चिल्लर उडत नाही. चिल्लरचे महत्व तुम्हाला लवकरच कळेल, असं सांगून विकासासाठी मी आणि अमित भैय्या, त्र्यंबकनाना आणि काकांचे हात मजबुत करा असं सांगितलं.
फटा पोस्टर, निकला हिरो
धिरज देशमुख म्हणाले की, भाजप वाले फक्त पोस्टर लावायचे काम करत आहेत. 2019 मध्ये लक्षात येईल फटा पोस्ट निकला हिरो. त्यांनी चार प्रश्न विचारले. कर्जमाफी झाली का, पिक विमा मिळाला का, आश्वासने पुर्ण झाली का, रस्ता खड्डामुक्त झाला का त्यांचे उत्तर लोक नाही म्हणत होते. तर रेणाने भाव दिला का, त्यावर लोक हो म्हणाले. येणारा काळ हा कॉंग्रेसचा आहे, असंही यावेळा धिरज देशमुख म्हणाले.
- छणचित्रे
- लोकांत प्रचंड उत्साह होता, लोक घोषणा देत होेते
- महापुर पाटी रेणापूर फाटा येथे पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
- पिंपळफाटा ते श्रीराम विद्यालयापर्यंत दुचाकी वाहनाच्या ताफ्याने पाहुण्याचे कार्यक्रम स्थळी आगमन झाले.
- सत्कारमुर्ती दिलीपराव देशमुख यांच्या सत्काराला लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. अत्यंत हसत हसत ते सर्वांचा सत्कार घेत होते
- ऊसाला विक्रमी भाव दिल्याबदद्ल शेतकऱ्यांत प्रचंड उत्साहाचे वातावरण होते.
- कार्यक्रमाला लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. हलक्यांचा कडकडाट व धीरज देशमुख यांच्या भाषणातील आक्रमकता याला लोकांनी साथ दिली.
- आ. त्र्यंबक भिसे यांच्या विषयी विरोधी पक्षनेते विखे पाटील म्हणाले की, तुमचे आमदार विकास कामासाठी प्रचंड पाठपुरावा करणारे व विधानसभेत आवाज उठविणारे आहेत.
- धीरज देशमुख म्हणाले त्र्यंबक नाना भिसे हे संयमी आहेत. लोकांनी टिका केली तरी ते संयमाने कृतीतुन उतर देतात.
- हा कार्यक्रम शेतकऱ्यांनी आयोजित केला होता. ठिकठिकाणी कमानी, कॉंगे्रसचे ध्वज दिसत होते.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment