दिलीपरावजी देशमुख हे सहकार महर्षी : राधाकृष्ण विखे पाटील

Friday, September 14, 2018

रेणापूर / प्रतिनिधी 
दिलीपरावजी देशमुख हे लोकाभिमुख काम करणारे सहकारी चळवळ जपणारे संयमी नेतृत्व आहे. विलासरावांनी सहकारी चळवळीचा पाया रचला तर दिलीपराव देशमुख यांनी कळस केला, असं मत महाराष्ट्र विधान सभेचे विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या शेतकऱ्यांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात अध्यक्षीय समारोपात केले.

 रेणा सहकारी साखर कारखान्याने मराठवाडा आणि विदर्भात सर्वाधिक ऊसाला भाव दिल्याबद्दल सत्कार आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठावर माजी मंत्री बसवराज पाटील, माजी राज्यमंत्री आ.अमित देशमुख, आ.त्र्यंबक भिसे, माजी आ. बाबासाहेब पाटील, माजी आ. वैजनाथ शिंदे, अशोकराव पाटील निलंगेकर, व्यंकटराव बेंद्रे, जिल्हा बॅंकेचे चेअरमन श्रीपती काकडे, रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आबासाहेब पाटील, वाईस चेअरमन सर्जेराव मोरे, माजी चेअरमन यशवंतराव पाटील, एस.आर.देशमुख, जागृती शुगरचे वाईस चेअरमन लक्ष्मणराव मोरे, मांजरा कारखान्याचे वाईस चेअरमन श्रीशैल्य पुटगे, उदगीरचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, दिलीप नाडे, चंद्रकांत मते, लालासाहेब चव्हाण, चंद्रशुड चव्हाण, अनंतराव देशमुख, मिठाराम राठोड कार्यक्रमाचे संयोजक व जि.प.सदस्य धिरज देशमुख, माजी सनदी अधिकारी भा.ई.नगराळे, माजी जि.प.अध्यक्ष बनसोडे गुरूजी, अनंतराव देशमुख, लालासाहेब चव्हाण, म.श.हलकुडे, आकनगिरे, मोईज शेख, समद पटेल, रेड्डी हे होते. 

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, दिलीपरावजी देशमुख हे सहकार महर्षी जिल्ह्याचे भुषण आहेत. व यावेळा मला स्व.विलासरावजी देशमुख यांची आठवण होते. शंकररावजी चव्हाण हे मुख्यमंत्री असतात अर्धी खाते हे विलासरावजींना दिले होते. त्यावेळा माझे वडील मला म्हणाले होते, मी आपणास साईबाबाची शपथ घेऊन सांगतो की, विलासरावजी मुख्यमंत्री होणार असं मला माझ्या वडीलांनी सांगितलं होते. आम्ही साखर कारखानदारीचा प्रयोग केला तो पाया विलासरावजींनी मजबुत केला आणि दिलीपराव देशमुखांनी त्यावर कळस चढविला. विलासरावजी हे मोठ्या मनाचे होते. त्यांनी सातत्याने त्यांना सारख विकासाचं वेड होतं. महाराष्ट्रभर त्यांचा मित्र परिवार होता. ते भिडस्त होते. त्यांच्या पाठींशी दिलीपरावजी खंबीरपणे उभे होते. आणि त्यांच्या सत्काराला येत असताना मला आनंद होतोय. एक दिलदार मैत्रीपण जगणारे नेते कार्यक्षम मंत्री सहकारी चळवळीला पुढे घेऊन जाणारे दिलीपरावजी देशमुख यांनी अत्यंत समर्थपणे काम केले आहे. ना. विखे पाटील म्हणाले की, एका बाजुला साखर कारखाने बंद पडत असताना विलासराव आणि दिलीपरावांनी सहकारी चळवळ समृद्ध केली. 

केंद्र आणि राज्य सरकारवर टिका करताना ना. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, केंद्र व राज्य सरकारने जनतेला फसवले, नागवलं, मी या व्यासपीठावर जास्त राजकीय बोलणार नाही. कारण पुढच्या आठवड्यात संघर्ष यात्रा येणार आहे. केंद्रातील आणि राज्यातील सरकार हे नतभ्रष्ट व तळभदरी आहे, असं सांगून ना. विखे पाटील म्हणाले, मायबाप सरकार फक्त घोषणा करतंय. 

सोजा बेटा नही तो मोदी आयेगा 
जनता धास्तावलेली आहे. पंतप्रधान फक्त घोषणा करतात. तेही मध्यरात्री करतात कोल्हापुरमध्ये मला एक शेतकरी म्हणाला की, आम्ही धास्तावलेले आहोत. मुलगा झोपेना गेला तर आम्ही म्हणतो सोजा बेटा नही तो मोदी आयेगा. 

अमित देशमुख उद्याच्या महाराष्ट्राचे भवितव्य 
विलासराव आणि दिलीपराव यांनी ज्या पद्धतीने काम केले. त्या पद्धतीने मी अमित देशमुखांकडे उद्याच्या महाराष्ट्राचे भवितव्य म्हणून पाहतो. मी जाहीर बोलतोय आमच्या हेतुबद्दल शंका घेऊ नका असंही विखे पाटील म्हणाले. 
खुप प्रयत्न झाले 
आमच्यात आणि विलासरावजींमध्ये संपर्क येऊ नये त्याबद्दल खुप प्रयत्न झाले, असं सांगून मतदारांनो राधाकृष्ण पाटील म्हणाले की, तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment