गौरी सण जिल्हाभरात उत्साहात साजरा

Tuesday, September 18, 2018

हिंगोली / प्रतिनिधी 
गणरायापाठोपाठ सोनपावलांनी महालक्ष्मींचे आगमन होत असते. गणेशाची माता पार्वती-म्हणजेच गौरी हिचेही स्वागत तितक्याच मंगलमय वातावरणात, उत्साहाने करण्यास हिंगोलीकरांनी केले. घरोघरी महालक्ष्म्यांची स्थापना करून गौरीचा हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. 

महालक्ष्मींचा हा सण तीन दिवस घरोघरी साजरा झाला. पहिल्या दिवशी आगमन, दुसऱ्या दिवशी गौरीपूजन व तिसऱ्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुक्ल अष्टमीला या गौरी-महालक्ष्मींचे विसर्जन करण्यात आले. काहींच्या घरी फोटोतल्या, मुखवट्याच्या, उभ्या, सुगडाच्या, खड्याच्या तर काहींच्या घरी मातीच्या मुखवट्याच्या महालक्ष्मी होत्या. प्रथेप्रमाणे त्यांची स्थापना, पूजन व विसर्जन केले. गौरींच्या सजावटीसाठी बाजारात वैविध्यपूर्ण साहित्य दाखल झाले होते. महालक्ष्म्यांच्या या सणामुळे तिनही दिवस बाजारात गर्दी पहावयास मिळाली. या सणामुळे बाजारात फुलांचा व केळींचा तुटवडा जाणवला. झेंडूच्या फुलांची हारजोडी शंभर तर वेगळ्या फुलाची हारजोडी तीनशे रूपयांना विक्रीस उपलब्ध होती. जिल्हाभरात या सणानिमीत्त उत्साह पहावयास मिळाला. दरम्यान, माजी आ.गजाननराव घुगे यांनी त्यांच्या निवासस्थानी सपत्नीक गौरी पुजन करून सण साजरा केला.

No comments:

Post a Comment