हिंगोली / प्रतिनिधी
फडणवीस सरकारचा कार्यकाळ हा मातंग समाजासाठी उज्वल असून यांच्याच काळात मात्र समाजाला न्याय मिळेल, असा विश्वास अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष तथा राज्यमंत्री मधुकर कांबळे यांनी 16 सप्टेंबर रोजी हिंगोली येथे मातंग समाजाच्या चिंतन मेळाव्यात व्यक्त केला.
येथील शासकीय विश्रामगृहात मातंग समाजाच्या चिंतन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त जिल्हान्यायाधीश पी.ए.खिल्लारे, वसंतराव जोगदंड, सुदाम जोगदंड, बबन शिखरे, जे.पी.खंदारे, देविदास खरात आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना कांबळे म्हणाले की, फडणवीस सरकार हे मातंग समाजासाठी सकारात्मक आहे. यांच्याच काळात मुंबई येथील अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लागला. मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह, स्वतंत्र पब्लिक स्कूल तसेच अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाला वाढीव निधी, फडणवीस सरकारच्या माध्यमातून मातंग समाजाला मिळत आहे. माझ्या माध्यमातून मी मातंग समाजाचे प्रश्न सरकार दरबारी वेळोवेळी मांडणार आहे. मातंग समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 2 ऑक्टोबर रोजी सर्व जिल्हास्तरावरील पदाधिकारी घेऊन आपण मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार असल्याची माहितीही राज्यमंत्री मधुकर कांबळे यांनी दिली. या चिंतन मेळाव्यात यशोदाताई कोरडे, डॉ. रवि थोरात, डॉ. माधव मानमोठे, आनंदराव शिखरे, सुनिल खंडागळे, किसन खंदारे, बाबुराव खरात, सोनाजी गवळी, शेषराव भालेराव, बी.आर.गाडे, अनिल खंदारे, मनिष खरात, अनिल फडसे, विशाल खंदारे यांच्यासह जिल्हाभरातील मातंग समाजाचे विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment