एकनाथ खडसे यांच्या भेटीला रामरतन शिंदे

Tuesday, September 18, 2018

हिंगोली / प्रतिनिधी 
माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची हिंगोलीचे भाजपा नेते रामरतन शिंदे यांनी नुकतीच हिंगोलीतील भाजपा पदाधिकाऱ्यांसह भेट घेतली आहे. 

15 सप्टेंबर रोजी झालेल्या या भेटीत राजकीय विषयावर तब्बल दिड तास चर्चा झाली असल्याचे समजते. यावेळी भाजपा नेते रामरतन शिंदे, डॉ. पुंजाजी गाडे, माजी शिक्षण सभापती पांडुरंग पाटील, सुभाष लदनिया, नरहरी पांचाळ, विष्णु जाधव, अनिल अगस्ती, माणिक पाटील भिंगीकर, किरण सरनाईक, नारायण कोटकर आदींची उपस्थिती होती. दरम्यान, या भेटीमुळे हिंगोली जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला पेव फुटले आहे.

No comments:

Post a Comment