खा.राजीव सातव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

Tuesday, September 18, 2018

हिंगोली / प्रतिनिधी
अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे गुजरात राज्य प्रभारी तथा हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खा.राजीव सातव यांच्या वाढदिवसानिमित्त 21 सप्टेंबर रोजी हिंगोली शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हिंगोली शहरात 21 सप्टेंबर रोजी दिवसभर वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम घेतले जाणार असून त्यात मोहम्मदीया इंग्लिश स्कुल आझम कॉलनी या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी महाआरोग्य तपासणी शिबीर घेण्यात येणार आहे. यात विद्यार्थ्यांची तपासणी अस्थिरोग तज्ञ डॉ.मनिष बगडीया, बालरोगतज्ञ डॉ.नितीन अग्रवाल, डॉ.मनिष मुपकलवार, नेत्ररोग तज्ञ डॉ.निलेश गुंडेवार, डॉ.प्रतिक दोडल, दंतरोग तज्ञ यांच्याकडून केली जाणार आहे. तसेच खाकीबाबा इंग्लिश स्कुल येथे विद्यार्थ्यांची दंत तपासणी शिबीर घेतले जाणार आहे. या शिबीरासाठी दंत महाविद्यालयातील दंतरोगतज्ञ तपासणी करणार आहेत. 

याशिवाय नप बालकमंदिर व डॉ.एकबाल उर्दु स्कुल येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आणी अंध विद्यालय व मुकबधीर वस्तीगृहात फळ वाटप आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध ठिकाणी वाढदिवसानिमित्त आयोजीत कार्यक्रमास आ.संतोष टारफे, जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, जिल्हा बॅंकेचे संचालक बाबा नाईक, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश अप्पा सराफ, सेनगाव तालुकाध्यक्ष विनायकराव देशमुख, हिंगोली तालुकाध्यक्ष शामराव जगताप, भागोराव राठोड, गजानन देशमुख, सलीम पठाण, सतीश खाडे, अशोकराव सरनाईक महिला जिल्हाध्यक्ष शोभाताई मोगले, शहराध्यक्ष बापुराव बांगर, नप गटनेते शेख नेहाल, डॉ.रवि पाटील गोरेगावकर, सेनगाव नपगटनेते विलास खाडे, नगरसेवक अनिल नैनवाणी, माबुद बागवान, आरेफ लाला, नजीर पठाण, विलास गोरे, बासीत मौलाना, मुजीब कुरेशी, संतोष भिसे, चांदु लांडगे, राजेश बगडीया, डॉ.माणिक देशमुख, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष जुबेर मामु, हिंगोली विधानसभा युवक अध्यक्ष बंटी नागरे, नितीन होकर्णे आदींची उपस्थिती राहणार आहे.

No comments:

Post a Comment