अंबाजोगाई (प्रतिनिधी)- अंबाजोगाई तालुका हा दुष्काळग्रस्त जाहिर करावा या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना मंगळवार दि. 18 सप्टेंबर रोजी देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे मा आ पृथ्वीराज साठे यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष रणजीत लोमटे यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,अंबाजोगाई तालुक्यात यावर्षी ही पावसाचे प्रमाण खुप कमी असल्यामुळे शेतीवर याचा खुप मोठा परिणाम झालेला आहे. पाऊस नसल्यामुळे शेतकरी हवालदील झालेला आहे व आत्महत्या करत आहे. पाऊस न पडल्यामुळे गुरांना चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. शेतकर्याची मानसीक,आर्थिक स्थिती खालावून गेली आहे.
त्यामुळे अंबाजोगाई तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. या सर्व बाबींचा विचार करून अंबाजोगाई तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहिर करावा अशी मागणी राज्य सरकारकडे उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे. निवेदनावर माजी आ.पृथ्वीराज साठे , पालिकेचे पाणीपुरवठा सभापती बबनराव लोमटे,पंचायत समितीच्या सभापती मिनाताई भताने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलासराव सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य शंकरअण्णा उबाळे, विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नेताजी साळुंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रणजीत लोमटे,शहराध्यक्ष उल्हास पांडे,राजपाल लोमटे,अमर देशमुख, रविकिरण देशमुख, दिग्विजय लोमटे,कैलास गायकवाड,दत्ता सरवदे,अंजली पाटील, अगस्ती ढगे, काकासाहेब जामदार, मिलींद बाबजे,रवी पवार,महादेव वाघमारे, अविनाश उगले,आनंद पांडे, सुर्यकांत पवार, सरपंच बाळासाहेब देशमुख,सुरेश जगताप, आबासाहेब पांडे,अजीत देशमुख, शिवहार आकुसकर, प्रा.डॉ.प्रशांत साबळे, दुर्गा शिंदे, निलाबाई गुट्टे, श्रीदेवी भगत,हिना शेख,सुरय्या शेख, सुनिता बिडवे,कविता शिंदे,राहुल जाधव, खालेद शेख सादीक, योगेश गायकवाड,शेख बिलाल,शेख उमेर, हसन चाऊस,बुद्धकरण जोगदंड,अमोल शिंदे, विशाल गिरी,हादीभाई यांच्या स्वाक्षर्या आहेत.

No comments:
Post a Comment