'३६० डिग्री स्कॅन' हे अॅप फोनमधले व्हायरस डिलिट करून टाकतं. यात चोरी रोखणारं फीचरही आहे. यामुळे हरवलेला मोबाईल शोधण्याचं कामही सोपं होतं. .
'हेवी ड्युटी अवास्ट' हे अॅप मालवेअर आणि व्हायरस डिलिट करून टाकतं. .
'अविरा अँटिव्हायरस सिक्युरिटी'मध्ये मालवेअर स्कॅन, रिअल टाईम प्रोटेक्शन यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत..
आजचं जग मोबाईलभोवती फिरत आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. त्यामुळे मोबाईल आपला पर्सनल अस्टिस्टंट बनला आहे. सध्याची बरीचशी कामं स्मार्टफोनच्या सहाय्याने पार पडतात. संपर्क साधण्यापासून आर्थिक व्यवहार हाताळण्यापर्यंत बहुसंख्य कामांसाठी हे गॅझेट उपयुक्त ठरतं. मात्र स्मार्टफोनमध्ये मालवेअर येण्याचं प्रमाण बरंच वाढलं आहे. अर्थातच यापासून फोन सुरक्षित ठेवायला हवा. त्यासाठी काही अँटिव्हायरस अॅप्स तुमच्या मदतीला येतील. त्यांची माहिती घेऊ या..

No comments:
Post a Comment