कर्नाटक सरकार पाडण्याचा प्रयत्न तीन सप्टेंबरला नवा मुख्यमंत्री

Sunday, August 26, 2018

कुमार स्वामींचा खळबळजनक दावा 

बेंगलोर :कर्नाटकमध्ये सत्तेवर असणारे जेडीएस व काँग्रेस आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि यातूनच 3 सप्टेंबर रोजी नवा व्यक्ती कर्नाटकचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याची गुप्त माहिती मला समजली आहे ,असा खळबळजनक दावा कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केला आहे .

कर्नाटकात सत्तेवर असणारे जेडीएस व काँग्रेस हे दोन्ही पक्ष सत्तेत भागीदार असले तरी त्यांच्यात सतत वादंग होत आहे .माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी जनतेचा आशीर्वाद मिळाला तर मी मुख्यमंत्री होईन असे वक्तव्य नुकतेच केले आहे. त्याच्यानंतर कुमारस्वामींनी केलेले हे विधान राज्यातील राजकीय स्थिती स्पष्ट करणारे आहे .माध्यमातील व्यक्तीने आपल्याला ही माहिती दिल्याचे कुमारस्वामी म्हणतात. आपण मुख्यमंत्री म्हणून किती दिवस राहू याच्यापेक्षाही मी करत असलेले काम माझे भविष्य ठरवणार असल्याचेही ते म्हणाले . कोणी कितीही प्रयत्न केले तरी सरकार पडणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment