वर्ष अखेरीस सुरु होणार मुम्बई- दिल्ली महामार्गाचे काम

Sunday, August 26, 2018

इंदूर - मनमाड रेल्वे;  महिनाअखेर सामंजस्य करार 
परकीय चलनातील कर्ज घेणार 

नवी दिल्ली :मुंबई -  दिल्ली या महात्वाकांक्षी   महामार्गाचे काम डिसेंबर २०१८ अखेर सुरू होणार आहे हा मार्ग झाल्यानंतर अवघ्या बारा तासात अंतर पार करता येणार आहे . अडीच ते तीन वर्षात ते पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि बंदर विकास मंत्री नितीन गडकरी यांनी  दिली.

इंदूर-मनमाड या ८ हजार  कोटी रुपयांच्या रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महिनाअखेरीस सामंजस्य करार होणार असल्याचेही गडकरी म्हणाले .
 जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांसह गडकरी यांनी बैठक घेतली त्यानंतर ते  बोलत होते. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष नीरज बन्सल यावेळी उपस्थित होते. मुंबई-दिल्ली द्रुतगती महामार्ग प्रकल्प एक लाख कोटी रुपयांचा आहे. यापैकी मुंबई ते बडोदा या टप्प्याच्या कामाची निविदा काढण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकल्पाचे भूसंपादन वेगाने सुरू  आहे. 

आर्थिक विकासासाठी महत्त्वाचा ठरणारा इंदूर-मनमाड रेल्वेमार्ग हा ८ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे .त्यात  जेएनपीटीच्या माध्यमातून पैसे गुंतवण्यात येणार आहेत.  या ८ हजार कोटी रुपयांच्या कर्जासाठी राष्ट्रीय बँकांकडून महाग कर्ज न घेता परकीय चलनात अवघ्या अडीच-तीन टक्क्यांच्या दराने स्वस्त कर्ज मिळवत असल्याचेही गडकरी म्हणाले. ऑक्टोबर महिन्यात एनएचएआयतर्फे तीन हजार रुपयांचे रोखे आणणार आहोत असेही त्यांनी सांगतिले.

जेएनपीटीतील रोजगारात कोकणवासीयांनाच प्राधान्य –

जेएनपीटीतील विशेष आर्थिक क्षेत्रात आणि इतर उपक्रमांत ६० हजारांहून अधिक जणांना रोजगार मिळणार आहे. या रोजगारापैकी ८० टक्के रोजगार हा कोकणातील स्थानिकांनाच मिळेल, अशी ग्वाही गडकरी यांनी दिली. त्याचबरोबर जेएनपीटीत गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांनाही तशी सक्त ताकीद दिल्याचेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment