लातूर दि प्रतिनिधी
लातूरचे सुपूत्र स्व.श्रीरामजी गोजमगुंडे हे मराठवाडयाचे पहिले सिने अभिनेते, दिग्दर्शक, लेखक निर्माते होते. अनेक मराठी चित्रपाटात त्यांनी भूमिका निभावल्या त्यांनी लातूर मध्ये 1980 साली चित्रपट निर्मीतीही केली होती. रंगभुमीची सेवा करत या महानकलावंताने अनेक नाटके अजरामर केली. राज्य नाटय स्पर्ध्येमध्ये सलग 3 वर्ष सुवर्ण पदक मिळविणारे ते एकमेव कलावंत होते. लातूरची सांस्कृतिक चळवळ वाठविण्यात व लातूरमध्ये नाटय संस्कृती रुजविण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या प्रेरणेने लातूर मध्ये अनेक कलावंत घडले व आजही घडत आहेत.
त्यांचे कलाक्षेत्रातील अजरामर योगदान पाहता लातूर येथील नियोजीत नाटयगृहास नटवर्य श्रीराम गोजमगुंडे नाटयगृह असे नाव देण्यात यावी अशी लातूर मधील नाटयप्रेमींची मागणी असून शासनाने नुकताच लातूरमध्ये नाट्यगृह उभारण्याचा निर्णय घेतला असून याकरिता निधीही उपलब्ध केला आहे.
आज श्रीराम गोजमगुंडे यांच्या जन्मदिनी लातुरात उभारल्या जाणाऱ्या नाट्यगृहास श्रीराम गोजमगुंडे यांचे नाव द्यावे अशी मागणी लातूर नाट्य रसिकांनी केली असुन याविषयी लातूरचे जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
लातूरकर नाट्य रसिकांच्या वतीने लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यु पवार,लातूर शहराचे आमदार माजी राज्यमंत्री अमित देशमुख यांनाही या मागणीचे निवेदन सादर करण्यात येणार आहे.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, Add करा हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment