हिंगोली / प्रतिनिधी
येथील शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्जाच्या अनुषंगाने कारवाई करण्यासाठी आठ हजार रूपयांची लाच स्विकारताना पोलीस कर्मचारी प्रदिप जाधव यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 17 सप्टेंबर रोजी रात्री रंगेहाथ पकडले आहे.
येथील शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी प्रदिप जाधव याने एका व्यक्तीकडे तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई करण्यासाठी वीस हजारांची लाच मागितली होती. मात्र तडजोडी नंतर पंधरा हजार रूपये देण्याचे ठरले. त्यापैकी आठ हजार रूपयांची रक्कम आता उर्वरित सात हजार रूपये दोन दिवसांनी देण्याचे ठरले होते. मात्र त्या व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. यवरून लाचलूचपत पथकाने सोमवारी रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास हिंगोली शहर पोलीस ठाण्याच्या परिसरात सापळा रचला होता. पोलीस कर्मचारी जाधव याने संबंधित व्यक्तीकडून आठ हजार रूपयांची लाच घेताच पथकाने त्यास रंगेहाथ पकडले.

No comments:
Post a Comment