कानडा राजा पंढरीचा राष्ट्रीय कृपा पुरस्काराने दिलीप ठाकूर सन्मानीत

Wednesday, September 19, 2018

नांदेड दि प्रतिनिधी : 
परभणी येथील जीवन साधना फाऊंडेशन ट्रस्ट तर्फे सामाजिक, धार्मिक,अध्यात्मिक, राजकीय क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल धर्मभूषण अ‍ॅड. दिलीप ठाकूर यांना "कानडा राजा पंढरीचा राष्ट्रीय कृपा " पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

परभणी येथील आनंद हायस्कूल मध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी भाजपा जिल्हा प्रसिध्दी प्रमुख प्रा. प्रविण गायकवाड,प्रा.गुलाबराव पंढरकर,प्रा.राजेश आडे,भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश सरचिटणीस अब्दुल बारी यांची प्रमुख उपस्थिती होती.संयोजक प्रा. एस. एम.कदम (सुखानंद) यांनी गेल्या बत्तीस वर्षा पासून दिलीप ठाकूर हे करत असलेल्या कार्याची माहिती देऊन त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यामागची भूमिका स्पष्ट केली.दिलीप ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना असे सांगितले की,हा पुरस्कार मिळाल्यामुळे जनसामान्यांची आणखी सेवा करण्याची प्रेरणा मिळाली असून जबाबदारी वाढली आहे.

दिलीप ठाकूर यांना यापूर्वी धर्मभूषण ही उपाधी,शान ए नांदेड पुरस्कार,आदर्श शिवसैनिक पुरस्कार,राजपूत भूषण पुरस्कार,माँ जिजाऊ रत्न पुरस्कार, समाज विभूषण पुरस्कार, छत्रपती सेवाभाई पुरस्कार, मातोश्री गंगूताई पुरस्कार, जीवन साधना पुरस्कार, भगत नामदेव लाईफ अचिव्हमेंट अवार्ड, अन्नपूर्णा प्रेरणा रत्न पुरस्कार,तिरंगा गौरव पुरस्कार मिळालेला आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्रा.प्रभाकर राऊत यांनी केले.भाजपा परभणी महानगर अध्यक्ष आनंद भरोसे यांनी आयोजीत केलेल्या मोफत डोळे तपासणी शिबिरानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments:

Post a Comment