तिकीट देता का ? तिकीट ...

Saturday, September 22, 2018

दहा दिवसांच्या मुक्कामाला आलेला बप्पा आणि उंदीरमामा जिल्हाभर फिरत होते .अहमदपूर दौरा झाल्यानंतर शेजारच्या लोहा कंधारचा काही भाग त्यांनी पाहिला होता. मागच्या खेपेला या भागात कमळाचे पीक मोठ्या प्रमाणात आले होते. बप्पाने पहिल्याच दिवशी लातुरात बैठक घेवून गुप्त माहिती घेतली होती. मागचा अनुभव लक्षात घेता यंदा तर अनेक जण इछूक होते .विशेष म्हणजे दोन्ही बाजूकडे अशीच परिस्थिती होती. संख्या एवढी होती की लोक अक्षरशः रस्त्यावर फिरत होते .तिकीट देता का तिकीट? असे म्हणत होते .

पण अजून तरी कोणी कोणाला जवळ केल्याचे दिसत नव्हते .मागच्या वेळी बाहेरच्या कावळ्याला बाहेरचा रस्ता दाखविणाऱ्या पक्षाला तर या वेळी खुपच अडचण होती .आणि कमळांचा पक्ष तर अजुनही मागच्याच धुंदीत असल्याचे बप्पाने पाहिले होते .' बेटा सुनील खडे हो जाओ ' असे खुद्द मोदीच म्हणाल्याने लोकानी काहीही विचार न करता त्याना दिल्लीला पाठवले होते .

पण..... हा पणच फार छळत होता. उंदीर मामाने मागच्या खेपेला तिरुपतीला जाण्यासाठी पत्र मागितले होते पण आठ दिवस चकरा मारून ते मिळालेच नाही .अखेर उंदीर मामाने आपला स्वतंत्र मार्ग शोधला होता. तरीही यंदा त्याना खात्री असल्याची खात्री होती .सरस्वती कॉलनीतून बाहेर पडलेल्या बप्पाला अजून खूप मंडळी भेटली. प्रत्येक गल्लीत आणि चौकात तिकीट देता का ? म्हणणारे थांबले होते. अनेकदा तर बप्पाने रस्ता बदलला पण काय करणार? एमायडीसी कडून बाहेर पडावे म्हणुन निघाला तर एक शो रूम वाला तिकीट मागु लागला .पक्ष कोणताही चालेल असे तो म्हणत होता. कमळात गर्दी जरा जास्तच होती .एकच चान्स म्हणणारा सुधाकर अक्षरशः बंडल घेवून बसला होता .हाताला सोडून मागच्या वेळीच कमळ हातात घेतलेला मोहन वाट पाहत होता .

भैय्यांचे 'संजय' कामात होते . भैय्या मात्र अजून काहीच बोलत नव्हते .अजून एक दाढीवाला सुधाकर यादीत होता .त्याची तर थेट गडापर्यंत मजल होती .पण गडाचा आशीर्वाद मिळणार की नाही हे कळणारे नव्हते. हात वाल्यांकडे यादी फार नसली तरी इछूक होतेच .यांची पसंती मात्र समजत नव्हती .पृथ्वीवर राज्य करणार एक माणूस जास्त जोरात होता .अजून एक होता .काय बरे नाव त्याचे? हा !त्याच्या नावातच विनोद जाणवत असे .रोजच्या रोज नवे विक्रम करणारे पेट्रोल विकणारा आणि कावळ्याचा नजरेचा एक पैलवान लंगोट बांधून तयार होता .त्याच्याशी कुस्ती खेळायला कोण येणार अशीच चर्चा सुरू होती .तिकडे अहमदपुरचे पुतळा सम्राट सिद्ध झाले होते. हा कुमार अजुनही सुर्यवंशात होता .हाताची घडी घातलेली एक महिला लातुरातून आरोळी ठोकत असल्याचे बप्पा ऐकत होता पण ही आरोळी कोणाच्या कानावर जाण्याची शक्यता नव्हती .

अजुन कोण राहिले ?बप्पाने हळूच मामाला विचारले .मामा डोके खाजवू लागला .रस्त्यात भेटलेले कोण कोण होते याची मामाला ओळखच नव्हती .म्हणून तर तो शांत होता .बप्पाकडे मात्र यादी तयार होती पण ही यादी बाहेर फोडायची नव्हती .यादी बाहेर पडली तर वांदे होणार याची बप्पाला खात्री होतीच .डोळे मारणारा एक डॉक्टर मात्र दुर्बीण लावून बसला होता त्याच्या नजरेला अजून तरी काहीच दिसत नव्हतें बहुधा मोतीबिंदू झाला होता त्याची शस्त्रक्रिया कुठे करावी याचीच त्याला चिंता लागली होती आता काय ?मुम्बई जावे की दिल्ली ? काहीच कळत नव्हते .१९८४ सालीच हातात आलेले तिकीट हरवलेले जयंतराव तेंव्हापासून अजुनही आपले तिकीट कुठे पडले याचाच शोध घेत होते अनेक वर्ष शोधुनही तिकीट सापडत नसल्याने यंदा अजून दुर्बिणी घेवून तिकीट शोधायचेच असा निर्णय त्यांनी घेतल्याचे उंदीरमामाने ऐकले होते ...

No comments:

Post a Comment