परळी दि.21......
50 रूपयांचे पेट्रोल 90 रूपये झाले आहे, 450 रुपयांची गॅसची टाकी 850 रूपयांना विकत घ्यावी लागत आहे. घरा-घरातून लुट करण्याचा उद्योग मोदी सरकारने सुरू केला आहे. त्यामुळे जनतेला खरोखरच अच्छे दिन आले आहेत का ? याची घरा-घरात जाऊन विचारणा करण्याचे आवाहन विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले आहे. केंद्र आणि राज्यातील थापाड्या सरकारला घालवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने संकल्प केला असून, त्यासाठीच दि.01 ऑक्टोबर, 2018 रोजी बीड मध्ये राष्ट्रीय अध्यक्ष खा. श्री. शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत विजयी संकल्प मेळावा घेण्यात येत असल्याची माहिती पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके यांनी दिली.
दि.01 ऑक्टोबर 2018 रोजी होत असलेल्या मेळाव्याच्या तयारीसाठी तालुकानिहाय सुरू असलेल्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज परळीतील हालगे गार्डन येथे परळी विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा संपन्न झाला, त्यावेळी हे मान्यवर बोलत होते. 2012 मध्ये शुन्यात असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज परळी विधानसभा मतदार संघाचा बालेकिल्ला झाला आहे. ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषदेपर्यंत आपण सर्व निवडणुका जिंकल्या आता पक्ष नेतृत्वाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची वेळ आली आहे. परळी विधानसभा मतदार संघात परिवर्तन करण्याची ताकद आहे. आपल्याला बीड जिल्ह्यातील सहाही जागा जिंकायच्या आहेत त्यासाठी कार्यकर्त्यांनी अंग झटकुन काम करावे, बीडच्या मेळाव्यात सर्वाधिक संख्येने उपस्थित राहून आपली ताकद दाखवून देण्याचे आवाहन श्री. धनंजय मुंडे यांनी या मेळाव्यात केले.
उद्योग तर लांब कारखानाही चालवता आला नाही
या मतदार संघाच्या लोकप्रतिनिधींकडे केंद्र आणि राज्यातील सत्ता असतानाही साधा एखादा उद्योग आणणे तर लांबच वारसा हक्काने मिळालेला वैद्यनाथ कारखानाही निट चालवता येत नाही, तिच गत वैद्यनाथ बँकेची करून ठेवली असल्याचा टोला श्री. मुंडे यांनी लगावला. परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे नाव केंद्र शासनाच्या रेल्वे आणि पर्यटन विभागातून वगळून परळीचा आणि साक्षात वैद्यनाथाचा अपमान केल्याबद्दल संताप व्यक्त करून एकवेळ विकास नाही झाला तरी चालेल मात्र शहराचा आणि भगवंतांचा अपमान कदापिही सहन करणार नाही, असा इशारा श्री. मुंडे दिला.
केंद्र आणि राज्य सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे. महागाई वाढली, शेत मालाचे भाव पडले, अच्छे दिनाच्या केवळ थापा मारणारे हे थापाडे सरकार असून, ते आपल्याला घालवायचे आहे त्यासाठीच निर्णायक लढाईचा लढा बीडच्या मेळाव्यातून उभा केला जाणार आहे, त्यामुळे या मेळाव्यास जास्तीत-जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन यावेळी बोलताना श्री. प्रकाशदादा सोळंके यांनी केले. युवकांची मोठी शक्ती मेळाव्यात दिसेल असा विश्वास यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष जयसिंग भैय्या सोळंके यांनी व्यक्त केला. यावेळी विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष गोविंदराव देशमुख, यांचेही भाषण झाले.
या कार्यक्रमास आष्टीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब आजबे काका, आप्पा राख, बाळासाहेब देशमुख, राजेश्वर आबा चव्हाण, कृ.उ.बा. सभापती गोविंदराव फड, जिल्हा उपाध्यक्ष माऊली आघाव, प्रा. डॉ. मधुकर आघाव, रणजित चाचा लोमटे, परळी शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, चंदुलाल बियाणी, डॉ. संतोष मुंडे, पं.स. सभापती मोहनराव सोळंके, उपसभापती पिंटु मुंडे, उपनगराध्यक्ष अय्युबभैय्या पठाण, दिपक नाना देशमुख, जाबेर खा पठाण, लक्ष्मणराव पौळ, वाल्मिक अण्णा कराड, विष्णुपंत देशमुख, शिवहार भताने, सुर्यभान नाना मुंडे, शकील कुरेशी, शिवाजीराव सिरसाट, माणिक भाऊ फड, वसंतराव कदम, गुलाबराव गंगणे, सुरेश टाक, केशव बळवंत, अकबर काकर, माऊली मुंडे, वसंत तिडके, सटवाजी फड, दत्तात्रय गंगणे, बाळासाहेब किरवले, मिर असम अली, विश्वांभर फड, गोपाळ आंधळे, जयप्रकाश लड्डा, अनिल अष्टेकर, अजिज भाई, महिला आघाडीच्या अन्नपुर्णाताई जाधव, सौ.रेश्माताई गित्ते, सौ.अर्चनाताई रोडे, सुलभाताई साळवे, वैशालीताई तिडके, गोदावरीताई पोखरकर आदींसह तालुक्यातील विविध पदाधिकारी, पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाजीराव धर्माधिकारी यांनी सुत्रसंचलन, गोविंद केंद्रे तर आभार प्रदर्शन प्रा. मधुकर आघाव यांनी केले. या कार्यक्रमास मतदार संघातील कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती.

No comments:
Post a Comment