प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते 23 रोजी उद्घाटन

Saturday, September 22, 2018

 लातूर जिल्ह्यातील दोन लाख कुटुंबांना योजनेचा लाभ होणार 

लातूर दि. 21:-आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही देशातील आरोग्य क्षेत्रात नाविण्यपुर्ण बदल घडवून आणणारी केंद्र शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी योजना असून या योजनेंतर्गत देशातील दहा कोटी कुटुंबांना मोफत उपचार देण्यात येणार आहेत. 

या योजनेचे उद्घाटन दिनांक 23 सप्टेंबर 2018 रोजी संपुर्ण देशभरासाठी देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रांची झारखंड येथून होणार असून महाराष्ट्रात माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व लातूर जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते त्याच दिवशी दुपारी 12 ते 2.30 वाजता प्रशासकीय इमारतीमधील नियोजन समिती सभागृहात होणार आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 83 लाख 72 हजार 870 कुटूंबांना मोफत उपचार देण्यात येणार असून लातूर जिल्ह्यातील जवळपास 2 लाख कुटुंबांना 5 लाख रुपये प्रती कुटुंब प्रतिवर्ष या योजनेचा लाभ मिळणार असून महाराष्ट्रात ही योजना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने सोबत एकत्रीतरित्या राबविण्यात येणार आहे. 

तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरीकांनी दिनांक 23 सप्टेंबर 2018 रोजी डीपीडीसी हॉल (नियोजन समिती सभागृह)जुने कलेक्टर ऑफिस शिवाजी चौक लातूर येथे दुपारी 12 ते 2.30 वाजता उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय ढगे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे व जन आरोग्य योजनेचे जिल्हा समनव्यक डॉ कुलदीप शिरपूरकर यांनी केले आहे. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण देशातील कोणताही लाभार्थी कोणत्याही राज्यातील संदर्भित रुग्णालयात लाभ घेऊ शकतो अशा स्वरूपाची वैद्य मोठ्या स्वरूपातील ही एकमेव योजना असल्यामुळे हे अत्यंत वेगळ्या धाटणीची योजना आहे. 

या योजनेचे लाभार्थी हे 2011च्या सामाजिक आर्थिक जाती जनगणनेच्या आधारावर काळातील 40 टक्के पद्धतीने निवडण्यात आले असून या सर्व लाभार्थ्यांची लाभार्थी पडताळणी व अतिरिक्त माहिती संकलन मोहीम ग्रामीण भागात 30 एप्रिल 2018 रोजी पासून तर शहरी भागात 27 मे 2018 रोजी पासून राबविण्यात आली व या अतिरिक्त माहिती संकलन मोहिमे अंतर्गत मिळालेली सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीने योजनेच्या वेबपोर्टलवर नोंदविण्यात आली असून आपण या योजनेचे लाभार्थी आहेत की नाही हे बघण्यासाठी लाभार्थी mera.pmjay.gov.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकतात अथवा 14555 टोल फ्री क्रमांकावर फोन करून सुद्धा माहिती मिळवू शकतात. 

या योजनांतर्गत रुग्णांना आयुष्यमान कार्ड देण्यात येतील हे क्यूआर कोड असलेले कार्ड मिळविण्यासाठी लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अथवा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजना पैकी कोणत्याही योजनेच्या संदर्भित रुग्णालयात जाऊन महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना / आयुष्यमान मित्रांशी संपर्क साधावा लागेल. 

हे आयुष्यमान कार्ड संपूर्णपणे मोफत असून यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. महाराष्ट्रात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना एकत्रितरित्या राबविण्यात येणार आहे. दिनांक 23 सप्टेंबर 2018 ठिकाण डीपीडीसी हॉल जुने कलेक्टर ऑफिस शिवाजी चौक लातूर, वेळ दुपारी १२ ते 2.30 या कालावधीत नागरिकांनी उपस्थित रहावे ,असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. 

No comments:

Post a Comment