आयफोन किंवा इतर काही फोनमध्ये मेमरी कार्डचा स्लॉट दिलेला नसतो. म्हणजे फोनमधल्या इनबिल्ट मेमरीतच आपल्याला सगळं काही सेव्ह करावं लागतं. यामुळे फोनची मेमरी लवकर फुल होते. मग काय, नको असलेले फोटो तसंच अॅप्स डिलीट करून मेमरी रिकामी केली जाते. याशिवाय दुसरा पर्यायच नसतो. मग नाईलाजाने आपण काही अॅप्स डिलीट करून टाकतो, पण अॅप्स किंवा फोटो डिलीट न करताही फोनची मेमरी वाढवता येते. यासाठी काय करायला हवं याविषयी.
फोनमधल्या कॅमेऱ्याची क्षमता फोटोचा दर्जा वाढवत नाही. पण यामुळे फोटोचा आकार वाढतो. यामुळे जास्त मेमरी वापरली जाते. हे टाळण्यासाठी फोटोचा आकार कमी करता येईल. फोनमधला डाटा तसंच इतर डॉक्युमेंट्स क्लाऊडमध्ये सेव्ह करता येतील. यासाठी वेगळं अॅप डाऊनलोड करण्याची गरज नाही. तुमच्या फोनमध्येच क्लाऊड स्टोरेजची सुविधा दिलेली असते. त्यात फोटो तसंच महत्त्वाचा डाटा सेव्ह करता येईल. यामुळे फोन मेमरी वापरली जाणार नाही.
फोनमधल्या अॅप्समुळे मेमरी फुल होते. मेमरी वाढवण्यासाठी अॅप्स डिलीट करण्याऐवजी तुम्ही फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन स्टोरेज-इंटर्नल स्टोरेज या ऑप्शनमध्ये जाऊन कॅशे डाटा क्लिअर करू शकता. स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅपचा वापर सर्वाधिक प्रमाणात केला जातो. व्हॉट्सअॅपवर फोटो आणि व्हिडीओ येत असतात. यामुळे मेमरी कमी होते. अशा वेळी तुम्ही व्हॉट्सअॅप मीडिया डिलिटचा ऑप्शन निवडू शकता. यासाठी फाईल एक्सप्लोररमध्ये जा. व्हॉट्सअॅप हा ऑप्शन सिलेक्ट करा. यानंतर व्हॉट्सअॅप इमेजमधल्या सेंट फोल्डरमध्ये जा. सेंट आयटम्स डिलीट करून टाका. .

No comments:
Post a Comment