काँग्रेसची निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
लातूर प्रतिनिधी
शेतकऱ्यांनी यंदा खरिप हंगामातील सोयाबीन, तूर, उडीद व मुग पीकांचे पावसाच्या अभावी नुकसान झाले आहे. पेरणी नंतर दिर्घकाळ पाऊस प पडल्यामूळे पीकांचा पालापाचोळा झाला आहे, यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. या अडचणीच्या काळात शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पीकांचे त्वरीत पंचनामे करून नुकसान भरपाई दयावी शुक्रवार (२१) रोजी असे निवेदननिवासी उपजिल्हाधिकारी यांना लातूर तालूका काँग्रेस कमीटीच्या वतीने जि.प.सदस्य धिरज विलासराव देशमुख, तालुका अध्यक्ष दगडूसाहेब पडीले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिले आहे.
निवासी उपजिल्हाधिकरी यांच्याकडे निवेदन देण्या अगोदर जि.प.सदस्य धिरज विलासराव देशमुख यांनी लातुर तालुक्यातील एकुरगा, माटेफळ, खंडाळा येथील शेतीची पाहणी करून शेतकऱ्यासोबत सद्याच्या परिस्थिती बददल चर्चा केली. खरिप हंगामाच्या सुरूवातीस पाऊस झाल्यानंतर पावसाने खंड दिल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले. जुलै व ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसात खंड पडल्यामुळे खरिप हंगामातील पीकांचे पोषण झाले नाही. शेंगालागण्याच्या स्थितीत पावसाने ओढ दिल्याने आलेले मुग, उडीद, सोयाबीन शेंगांचे पोषण झाले नाही. सदया उन्हाची तीव्रता वाढल्यामुळेही पाने पिवळी पडत आहेत, यामुळे सोयाबीनचा पाचोळा झाला आहे. खरीपातील सर्व पिके आता शेतकऱ्याच्या हातून गेले आहेत. शेतकरी सद्या आर्थीक अडचणीत सापडला आहे. शासनाने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने पीकांचे पंचनामे करून मदत देऊन दिलासा द्यावा, यासाठी शुक्रवार रोजी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेतली. शेतकऱ्यांना या अडचणीतून सोडवण्यासाठी शासनाने तातडीने नुकसान झालेल्या पीकांचे पंचनामे करावेत असे लातूर तालूका काँग्रेस कमीटीच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
लातूर तालूक्यातील शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात शासनाने दिलासा देण्यासाठी पीकांचे पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना विमा मुंजूरीसाठी कार्यवाही त्वरीत करावी अशी मागणी काँग्रेसच्या जि.प.सदस्य धिरज देशमुख, लातूर तालूका काँग्रेस अध्यक्ष दगडूसाहेब पडीले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी यांना केली आले.यावेळी यावेळी लातूर ग्रामीणचे तालुकाध्यक्ष दगडूसाहेब पडिले, २१ शुगर कारखान्याचे समन्वयक विजय देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन गोविंद बोराडे, लातूर कृषी उत्तन्न बाजार समितीचे उपसभापती मनोज पाटील, लातूर पंचायत समितीचे उपसभापती दत्ता शिंदे, लातूर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष रघुनाथ शिंदे, रविंद्र काळे, प्रकाश उफाडे, रामचंद्र सुडे, अनंत बारबोले,चंद्रकांत टेकाळे, प्रताप पाटील, रामराजे चामे, अनिल पाटील, सुभाष घोडके, नरेश पवार आदीची उपस्थिती होती.
धिरज देशमुख यांची पाहणी करून शेतकऱ्या सोबत चर्चा
जि.प.सदस्य धिरज विलासराव देशमुख यांनी विविध गावातील शेतकऱ्यांच्या पीकांची पहाणी करून शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. यामध्ये एकुर्गा येथे विश्वनाथ पाटील, विठोबा कोरके, दिनकर इंगळे,नारायण पाटील, जालींदर घुटे, गजेंद्र घुटे, सुदर्शन साबळे, माणिक नागटिळक, भैरवनाथ घुटे, नवनाथ घुटे, पप्पू शिंदे, श्रीकृष्ण पाटील, दयानंद इंगळे, हणमंत साळूंके, सतिष घुटे, नंदू खेडकर, ओम घुटे, मेघा नागटिळक, कमलाकर इंगळे, अमर इंगळे, बालाजी घुटे, तानाजी शिंदे, राजाभाऊ घुटे, विष्णू पटाडे, नंदू नागटिळक, बालासाहेब पाटील, संभाजी नागटिळक, लक्ष्मण घोडके, धनू भालेकर, बाळू इंगळे, हरी पटाडे, आप्पा घुटे, अमर पाटील, पांडूरंग पाटील, मनुसिंग चव्हाण, प्रदिप पाटील, कमलाकर भिसे, वृश्चिक मेटे, अनंत गडकर, विठ्ठल कतलाकुट्टे, बाबुराव घोडसे, गुरुनाथ येलगटे, विशाल पाटील, गणेश ढगे माटेफळ येथे राजेसाहेब सवई, जगदीश चोरमले, प्रताप खोसे, राजाभाऊ पाटील, राऊत सर, दिपक काळे, महेश चव्हाण, श्रीकृष्ण काळे, दिंगबर खोसे, अमोल भिसे, समाधान घुटे, रामभाऊ गोरे, इंगळे, देशमुख,दिपक हजारे, सचिन कदम, रंजित पाटील, यशवंत शिंदे, अशोक वाघमारे, आलिम शेख, सुभाष दळवी, हनमंत खोसे, खंडाळा येथे बाळासाहेब झाडके, भैरवनाथ झाडके, शरद झाडके, रामदास झाडके, शाहीर अशोक शिंदे, दत्तात्रय पाटील, विनोद पाटील, भास्कर झाडके, बप्पा शिंदे, शेषेराव पाटील, नवनाथ पूरी, रामदास निकम, अच्युत झाडके, अनंत झाडके, नरहरी झाडके, रावसाहेब झाडके, हमीद शेख, गोपाळ पानढवळे, धनु माचवे, साहेब गरड, भजनदास भाकरे, दिलीप शिंदे, बिभीषण झाडके, सुभाष झाडके, जयचंद शिंदे, महेश शिंदे, लक्ष्मण शिंदे, सुंदर शिंदे, संजय शिंदे, संजय गंड, नंदु सोनवणे, दिनेश शिंदे, बालु शिंदे आदी शेतकरी होते.
No comments:
Post a Comment