आडत दुकानातुन राशनचा , १ लाख १२ हजारांचा गहू जप्त

Saturday, September 22, 2018



आखाडा बाळापूर / प्रतिनिधी
सर्वसामान्याचे हक्काचे राशन पळवून आडत दुकानात त्यांची साठवण करत काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने जमा केलेला राशनचा गव्हू बाळापुर पोलिसांनी शुक्रवार दि २१ ला वारंगा फाटा येथे पकडला आहे़ यामध्ये जवळपास ६५ ते ७० पोते असून याची किमंत अंदाजे १ लाख १२ हजारावर आहे़ याप्रकरणी बाळापुर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे़ ही कार्यवाही बाळापुर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी केली.


कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथील दुर्गादास अग्रवाल यांच्या आडत दुकानात राशनचा गव्हू असल्याची माहिती बाळापुर पोलिसांना व्हॉटसपव्दारे प्राप्त झाली होती. बाळापुर पोलिसांनी याची खात्री केल्यानंतर कोणताही विलंब न करता शुक्रवार (दि२१) दुपारी २ वाजता अग्रवाल यांच्या आडत दुकानावर धाड टाकली असता, राशनचा ६५ ते ७० क्विंटल गव्हू आढळून आला. विशेष म्हणजे गव्हाने भरलेले सर्व पोते हे भारतीय खाद्य निगमचे पोते असलेले आहेत. त्यामुळे हा गव्हू राशनचा असल्याचे स्पष्ट झाले. गव्हाची किमंत जवळपास १ लाख १२ हजार रूपये असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे़ या प्रकरणी आडत दुकानदार दुर्गादास अग्रवाल यांना बाळापुर पोलिसांनी अटक केली आहे़ गेल्या काही दिवसापासून सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी बाळापुर ठाण्यातंर्गत येणाऱ्या अवैध धंद्याबाबतची माहिती व्हॉटसॅपवर कळवा आम्ही कार्यवाही करू असे आवाहन केले होते. 

त्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक कार्यवाही करण्यात आल्या आहेत. त्यातीलच ही एक मोठी कार्यवाही असून बाळापुर पोलिसांच्या अशा धडक कामगिरीमुळे राशनच्या मालाचे काळेबेरे करणाऱ्या अनेकांचे धाबे दणाणले आहेत. ही कार्यवाही एपीआय चिंचोलकर यांच्या पथकाने केली आहे. बाळापुर ठाण्याच्या हद्दीतील राशनच्या मालाबाबत ही सर्वांत मोठी कार्यवाही असल्याचे बोलले जात आहे.

No comments:

Post a Comment