भारत-पाक चर्चा रद्द!

Saturday, September 22, 2018

नवी दिल्ली : पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून द्विपक्षीय चर्चा सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. भारताने या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेदरम्यान परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज पाकचे त्यांचे समकक्ष शाह महमूद कुरेशी यांची भेट घेतील, असे स्पष्ट केले होते. अतिरेक्यांनी शुक्रवारी जम्मू-काश्मिरात ३ पोलिसांची निर्घृण हत्या केल्यानंतर संतप्त झालेल्या भारताने पाकसोबतची न्यूयॉर्कमध्ये होणारी बहुचर्चित परराष्ट्रमंत्री स्तरीय चर्चा रद्दबातल केली आहे. 'पाक पंतप्रधान इम्रान खान यांचा खरा चेहरा त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीलाच उजेडात आला आहे. त्यामुळे वर्तमान स्थितीत पाकसोबत कोणतीही चर्चा करणे निरर्थक आहे,' असे भारताने या प्रकरणी स्पष्ट केले आहे. 

 'पाक पंतप्रधान इम्रान खान यांचा खरा चेहरा त्यांच्या कारकीर्दीच्या प्रारंभीच उजेडात आला आहे. त्यामुळे वर्तमान स्थितीत पाकसोबत कोणतीही चर्चा करणे निरर्थक आहे. तद्नुसार, सरकारने दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची न्यूयॉर्कमधील प्रस्तावित बैठक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे,' अशी घोषणा केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी केली. .

No comments:

Post a Comment