मुंबई :
चांगली पटकथा मिळाली तर बॉलिवूडमध्ये काम करण्यास आपण तयार आहोत, असे अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने म्हटले आहे. विवाह आणि नंतर मुलाचा जन्म यामुळे शिल्पा शेट्टी बॉलिवूडपासून बराच काळ दूर राहिली होती. तिचा अखेरचा चित्रपट 'अपने' २००७ मध्ये आला होता. शिल्पाने सांगितले की, आपण पुन्हा अभिनय क्षेत्रात परतण्यास तयार आहोत. कारण आता यासाठी मी वेळ काढू शकते. एका कार्यक्रमात शिल्पा आली असता पत्रकारांनी तिला विचारले तेव्हा ती म्हणाली की, मी चित्रपटांमध्ये पुन्हा अभिनय करू शकते. कारण आता माझा मुलगा साडेसहा वर्षांचा झाला आहे..

No comments:
Post a Comment