तुळजापूर तीर्थक्षेत्राचा रेल्वेमार्गासाठी पाठपुरावा करु - खासदार संभाजी महाराज

Wednesday, September 26, 2018

जगातील भाविक तुळजापुरात आला पाहिजे असे नियोजन व्हावे 


तुळजापूर दि २५ वार्ताहर
तुळजापूर तीर्थक्षेत्राला रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी आपण नुकतीच महाराश्ट्राचे जेष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या सोबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रेल्वमंत्री पियुश गोयल यांच्याबरोबर चर्चा केली आहे, याप्रष्नासाठी आपण पाठपुरावा करु अशी माहिती खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी दिली.

तुळजाभवानी मंदिरात खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले, कोल्हापूर संस्थानच्या वतीने करण्यात येणारी तुळजाभवानीची सेवा नित्य चालू असल्याने छत्रपती संभाजी महाराज यांचे या आराध्यदेवतेशी अत्यंत निकटचे संबंघ आहेत. त्यांनी अनेक विशयावर तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांच्याशी चर्चा केली. अध्यक्ष गमे यांनी संस्थानच्या नियोजनात प्रस्तावित असणाऱ्या अभिशेक मंडप व नव्याने उभारण्यात येणारा दर्शन मंडप याचा आराखडा दाखविला. देशातील नव्हे तर परदेशातील भाविक तुळजापूरला आला पाहिजे असे भविष्याचे नियोजन केले गेले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली 

आपण कुलदेवता भवानी मातेच्या क्षेत्राच्या विकासाबरोबर रेल्वे मार्ग तातडीन होण्यासाठी सर्वतोपरी हातभार लावत आहोत. रेल्वेमंत्री, पंतप्रधान यांनाही आपण भेटू यापुर्वी केलेले प्रयत्नही त्यांनी सांगितले. यावेळी जि.प.चे माजी अध्यक्ष अॅड.धीरज पाटील, भाजपचे जेष्ठ नेते सुधीर पाटील, तालुकाध्यक्ष भाजपा सत्यवान सुरवसे, जिल्हयाचे चिटणीस गुलचंद व्यवहारे, तालुका सरचिटणीस विकास मलबा, छावाचे विभागीय अध्यक्ष जीवनराजे इंगळे, जिल्हाध्यक्ष महेष गवळी, कुमार टोले, आण्णासाहेब क्षिरसागर यांची उपस्थिती होती. 

तत्पुर्वी छत्रपती संभाजी महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्प हार अर्पण केला. मंदिरासमोर भाजपाचे जिल्हाचिटणीस गुलचंद व्यवहारे यांनी पुष्प हार देवून छत्रपती संभाजी महाराज यांचे स्वागत केले. याप्रसंगी छावाच्या वतीने मराठा आरक्षण प्रष्नावर आगामी काळात अधिक लक्ष देण्याची विनंती करणारे निवेदन छत्रपती संभाजी महाराज यांना छावाच्या शिष्ट मंडळाने दिले. तुळजापुरात पासपोर्ट मिळण्यासाठीचे कार्यालय होण्याबाबत पाठपुरावा आपण केल्याचे सांगून त्याचा लाभ सर्वांना मिळणार आहे असे सांगितले

No comments:

Post a Comment