हासेगाव फार्मसीत जागतिक औषधनिर्माता दिनानिमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबीर

Wednesday, September 26, 2018

औसा : श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयच्या वतीने जागतिक औषधनिर्माता दिना निमित्त हासेगाव ग्रामपंचायत येथे एक दिवसिय मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजण करण्यात आले . या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या मूर्तीचे पूजन व दिपप्रज्वलन करून करण्यात आली. 

या कार्यक्रमाची प्रास्ताविकपर भाषण प्रा. श्री हरंगुळे वाय यांनी केले तर लातूर कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य श्री नंदकिशोर बावगे यानी कार्यक्रमाबद्दल माहिती दिली . या शिबिरात तब्बल २०० लोकांचा आरोग्य निदान तपासणीसाठी सहभाग होता .या आरोग्य तपासणी शिबिरास प्रमुख अथिति म्हणून आरोग्य उपकेंद्र हासेगाव येथील डॉ.बेलापट्टे जी. पी.व लातूर येथील भौतिक उपचार तज्ञ् डॉ. कोकणे एस, श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. जयदेवी बावगे, हासेगाव नगरीचे सरपंच सौ. लैलाबी पठाण,उपसरपंच श्री हिरामण आडे,हासेगाव ग्रामपंचायत सदस्य श्री मनसूर पठाण ,श्री महमूद पठाण , श्री तुकाराम हंगरगे, श्री प्रल्हाद कांबळे , राजीव गांधी इन्स्टिटूट पॉलीटेकनिक कॉलेज चे प्राचार्य श्री संतोष मेदगे,महाविद्यालयातील शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी , विध्यार्थी आणि सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांबळे अंजली आणि कदम ऐश्वर्या या विध्यार्थ्यानी केले.तसेच महाविद्यालयातील विध्यार्थ्यानी लातूर येथील महाविद्यालाये आणि औषधी दुकाने व सर्व सामन्य नागरिकांमध्ये औषध निर्माता या व्यवसायाबद्दल शुभेच्छा पत्र देऊन जनजागृती केली व जागतिक औषधनिर्माता दिनाच्या शुभेच्या दिल्या.

No comments:

Post a Comment