जोे चमत्कार करतो तो बदमाश असतो-डॉ. स्वप्ना लांडे

Wednesday, September 19, 2018

हिंगोली / प्रतिनिधी 
या जगात कोणालाही चमत्कार करता येत नाही, या नावाखाली हातचलाखी आणि विज्ञानाचे प्रयोग केले जातात. जो-जो चमत्कार करतो तो बदमाश असतो असे प्रतिदपादन अंनिसच्या महिला संपर्क प्रमुख डॉ.स्वप्ना लांडे यांनी हिंगोली येथे केले. 

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या हिंगोली शाखेच्या वतीने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात त्यांनी चमत्कार, बुवाबाजी, साक्षात्कार या विषयावर मार्गदर्शन करून जाटुटोणा विरोधी कायदा या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच दुपारच्या सत्रात विदर्भ संपर्क प्रमुख अशोक घाटे यांनी चमत्कार, प्रात्याक्षिके दाखवून भुत, भानामती, मंत्र-तंत्र अंगात येणे यावर सविस्तर मार्गदर्शन केले. 

सकाळी 11 ते 5 पर्यंत चाललेल्या या शिबीरात 50 पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रा.बी.एस.जाधव, कुमार कांबळे, शिवशरण रटकलकर, शेख अब्दुल रब, विठ्ठल सोळंके, निलेश रणवीर, राजकुमार जावळे, शाहीर प्रकाश दांडेकर, राजेंद्र खंडारे, दत्ता तपासे, दादाराव शिंदे, नागेश नरवाडे, शेख अजिम, शेख आवेस आदी कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment