हिंगोली / प्रतिनिधी
महाराष्ट्रातील विदर्भ-मराठवाडा व खान्देश भागातील नदीजोड प्रकल्प गोदावरी तापीबाबत अभ्यासपुर्ण प्राणहिता प्रकल्पाचे सादरीकरण भाजपा नेते पी.आर.देशमुख यांनी ना.नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे केले आहे.
सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पी.आर.देशमुख यांनी प्राणहिता प्रकल्पाअंतर्गत गोदावरी, तापी नदीजोड प्रकल्पाबाबत सविस्तर अभ्यास करून शासनाकडे तो अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये सन 2017-18 च्या डीएसआर प्रमाणे या प्रकल्पाची एकूण किंमत 70 हजार कोटी रूपये असून पाण्याचा वापर 14 हजार दलघमी आहे. या प्रकल्पाद्वारे 28 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येवू शकते. तसेच पिण्याच्या पाण्याचा व कारखानदारीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागु शकतो, अशी या प्रकल्पात नमुद केले आहे.
त्यामुळे हा प्रकल्प तांत्रिक दृष्ट्या व आर्थिक दृष्ट्या सरकारला परवडणारा असून या प्रकल्पास तात्काळ मंजूरी देण्यात यावी, अशी मागणी पी.आर.देशमुख यांनी ना.नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी दानवे यांची भेट घेतली.

No comments:
Post a Comment