अत्याचारातील आरोपीला फाशी द्या वसमत येथे शेकडो महिला रस्त्यावर

Wednesday, September 19, 2018

वसमत / प्रतिनिधी 
अहमदनगर येथील अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करणारा व त्यास पाठीशी घालणाऱ्या सहकाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी वसमत येथे पद्‌मशाली समाज संघटनेच्या शेकडो रणरागिनी मंगळवारी 18 सप्टेंबर रोजी केली. 

मराठवाडा पद्‌मशाली महासभा सलग्न पद्‌मशाली समाज हिंगोली जिल्हा संघटनेच्या वतीने वसमत शहरातील मुख्य मार्गावरून मूक मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चेकऱ्यांनी हातात विविध संदेश देणारे फलके घेऊन घटनेविरोधात रोष व्यक्त केला. हा मुकमोर्चा दुपारी 12 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे पोहोचला. व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, अहमदनगर शहरातील तोफखाना भागातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा लतीफ सय्यद वय 24 वर्ष या आरोपीस अटक करण्यात आली असून त्याची पार्श्वभूमी अट्टल गुन्हेगारी प्रवृत्तीची त्यामुळे सदर पीडित कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, नराधमास मदत करणाऱ्या व दबाव टाकणाऱ्यांना सह आरोपी करावे, सदरचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, पीडित मुलीच्या कुटुंबाला तातडीची 25 लाख रुपये मदत द्यावी, पीडित मुलीच्या शिक्षणाचा खर्च शासनाने करावा व भविष्यात तिला शासकीय नोकरीची लेखी हमी द्यावी, पीड़ित मुलीला सर्व वैद्यकीय मदत मिळावी आदी विविध मागण्यांचे निवेदन हिंगोली जिल्हा पद्‌मशाली समाजातर्फे देण्यात आले.

या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. निवेदनावर माजी नगराध्यक्षा सुषमा बोडेवार,कमलबाई गुंडेवार, रेखा म्यानेवार, मीनाक्षी नल्लेवार, जिल्हाध्यक्ष डॉ. गोविंद इपकलवार, माजी नगराध्यक्ष तथा पद्‌मशाली समाजाचे जेष्ठ नेते शिवदास बोड्डेवार, डॉ. मारोती क्यातमवार, नगरसेवक सीताराम म्यानेवार, नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार, नगरसेवक धनंजय गोरे, सचिन दगडू, काशीनाथ भोसले, शिवाजी अलडिंगे, माजी नगराध्यक्ष भगवान कुदाळे, पद्‌मशाली युवा जिल्हाध्यक्ष रितेश मजनवार, दशरथ मज्जनवार, विश्वनाथ गुंडेवार, दशरथ कदम, नितीन गुंडेवार, चंद्रशेखर नल्लेवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments:

Post a Comment