हिंगोली / प्रतिनिधी
अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे गुजरात राज्य प्रभारी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजीव सातव यांच्या वाढदिवसानिमित्त 21 सप्टेंबर रोजी शुक्रवारी कळमनुरी येथे हभप रामरावजी महाराज ढोक यांच्या किर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
खा.सातव यांच्या वाढदिवसानिमित्त कळमनुरी येथील कै.शंकरराव सातव महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रियदर्शनी सेवाभावी संस्था व जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने 21 सप्टेंबर रोजी शुक्रवारी सकाळी 10 वाजता हभप रामरावजी महाराज ढोक यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास माजी मंत्री रजनीताई सातव, खासदार राजीव सातव, आ.संतोष टारफे, डॉ.प्रज्ञाताई सातव, जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, जिल्हा बॅंकेचे संचालक बाबा नाईक यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार या कीर्तन कार्यक्रमास भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रियदर्शनी सेवा संस्था व जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment