नांदेड दि प्रतिनिधी : आजची पिढी कॅम्पुटर, मोबाईलमध्ये जास्त व्यस्त आहे. ३३ टक्के विद्यार्थी या तंत्रज्ञानाचा उपयोग चांगल्या कामासाठी करतात पण ६७ टक्के विद्यार्थी याचा दुरुपयोग करतात. हे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी घातक आहे. यामध्ये परिवर्तन होणे आवश्यक आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा उपयोग चांगल्या कार्यासाठी करा, असे मत कुलगुरू डॉ.दिलीप म्हैसेकर यांनी व्यक्त केले.
माझ्यासाठी भाग्याचा दिवस
माझ्या आई-वडिलांच्या नावाने दिल्या जाणारे पुरस्कारांचे वितरण माझ्या हस्ते होत आहे. हे माझे भाग्य आहे. हा दिवस माझ्यासाठी भाग्याचा दिवस आहे. योगायोगाने कुलगुरू डॉ.दिलीप म्हैसेकर यांना शालेय जीवनात शिक्षण देणाऱ्या शिक्षिका सुरेंद्रकौर दिवानसिंग यांची प्रेक्षकामध्ये उपस्थिती होती. हे कुलगुरूंनी पाहिल्यावर प्रेक्षकांमध्ये जाऊन त्यांनी त्यांना अभिवादन करून त्यांचा सत्कार केला व आशीर्वाद घेतला.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्ताने आज मंगळवार, दि.१८ सप्टेंबर रोजी दुपारी ३.०० विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीमधील हॉल क्र.३११ मध्ये परीक्षा विभागातर्फे आयोजित करण्यात आलेला रोख पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमामध्ये विद्यापीठ परिक्षेत्रातील चारही जिल्यामधून एकूण ५४ गुणवंत्ताना ७१ रोख पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिलीप म्हैसेकर होते. त्यांच्या समवेत व्यासपीठावर कुलसचिव डॉ. रमजान मुलानी, वित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि एन. सरोदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजेश्वर दुडूकनाळे, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे ते म्हणाले की, वैदयकीय शिक्षणाशिवाय विद्यार्थ्यांनी इत्तर केंद्रीय स्पर्धा परीक्षांमध्ये करिअर करण्यासाठी मेहनत घ्यावी. इत्तर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र बराच मागे आहे. नवीन पिढीसमोर हे एक आव्हान आहे.
उन्हाळी-२०१८ मध्ये घेतलेल्या परीक्षेमध्ये वेगवेगळ्या विषयामध्ये सर्वप्रथम व द्वितीय आलेले गुणवंत विद्यार्थी नागेश दरेकर, अंकिता गायकवाड, हरज्योतकौर शाहू आणि शांता गिरी यांना प्रत्येकी तीन रोख पारितोषिक मिळाले. तर तेजस्विनी पौळ, अल्का गौंड, प्रीती चिद्रावार, रुपाली गुब्रे, सचिन शेजूळ, संध्या अर्सनालकर, रिना कराड, धनश्री कायले, यास्मीन मोहम्मद, दिपाली सोनवणेआणि अजित चव्हाण या विद्यार्थ्यांना दोन रोख पारितोषिकांनी सन्मानीत करण्यात आले. तसेच संजीवनी बिरादार, श्रुती कुलकर्णी, शाल्वी अमिलकंठवार, दिपाली परतवाड, उषा घुगे, नगमा शेख, ज्योती सोमवंशी, स्नेहा घनसावंत, अनिकेत राठोड, सीमा जनोळे, फरहीन बेगम, अशोक मितेश, मंदाकिनी त्रिपाठी, अस्मा बिरादार (तांबोळी), वैशाली पोधडे, पूजा शिरामे, मोहम्मद कासीम, मृणालिनी बोरकर, रविना ढगे, शेख नर्गिस, प्रिया पारवे, पूजा काहेकर, प्रियंका रंगवाल, अश्विनी केवटे, अनिता गायकवाड, पूनम तिगोटे, प्रज्ञा हाके, प्रतीक्षा लोंढे, पठाण नुझहत, मनीषा डक, महेश वानोळे, रजनीगंधा धुमाळ, पूजा बेलगुरे, जयपाल गायकवाड, सय्यद खाजाबी, आशिया रसूलमिय्या आणि पूजा मांडलिक हे सर्व विद्यार्थी एका रोख पारितोषिकाचे मानकरी ठरले.
यावेळी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, विविध प्राधिकरणावरील सदस्य, विद्यापीठ परिक्षेत्रातील विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक यांच्यासह विद्यापीठातील संचालक, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वैजनाथ अनमुलवाड यांनी केले तर आभार विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजेश्वर दुडूकनाळे यांनी मानले.
No comments:
Post a Comment