3 लाख 70 हजार रूपयांची चोरी

Wednesday, September 19, 2018

हिंगोली / प्रतिनिधी 
औंढा नागनाथ तालुक्यातील मुख्य राज्य महामार्गावरील शिरडशहापूर जवळील जिनिंगच्या चालू अवस्थेतील रोहित्र बंद करून खाली उतरून ऑईल व तांबे यांची 3 लाख 70 हजार रूपयांची धाडसी चोरीची घटना 16 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली. 

सुखमनी जिनिंगला स्वतंत्र वीज पुरवठा व रोहित्र आहे व ही जिनिंग मुख्य महामार्गावर आहे. रविवारी रात्री 12 वाजतानंतर चालू रोहित्राचा वीजपुरवठा बंद करून कंपाऊड भिंत तोडून रोहित्र खाली उतरवून 500 लिटर ऑईल 1 लाख रूपयांचे व 450 क्विंटल तांबे 2 लाख 70 हजार किमतीची धाडसी चोरीची घटना घडली. विशेषत: ही घटना मुख्य राज्य रस्त्यालगतच घडली असून चोरीला 4 ते 5 तासातच झाल्याचे बोलल्या जात आहे. व तेही कंपाऊंड भिंत तोडून धाडसी चोरीची घटना घडली हे विशेष. 

सदर घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी शशिकिरण काशिद व महावितरण अभियंता ए.आर.मेश्राम यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. तरणजीत सिंग यांच्या फिर्यादीने कुरूंदा पोलीस ठाण्याला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सपोनि शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अशोक कांबळे, जमादार वाय.जी.वाघमारे, शंकर भिसे हे पुढील तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment