पवारांनी राजकीय आपत्तीवर आम्हाला मार्गदर्शन करावे : मुख्यमंत्री

Sunday, September 30, 2018

सत्यजीत बद्दर
किल्लारी दि प्रतिनिधी 
 राज्याचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी पंचवीस वर्षांपूर्वी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात आलेल्या भूकंपाच्या संकटात आपत्ती व्यवस्थापनाचे उत्कृष्ट कार्य केले या वर त्यांनी पुस्तिकाही काढली आहे याचा संदर्भ देत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना राजकीय आपत्तीवर एखादी पुस्तिका असेल तर आम्हाला द्यावी असे वक्तव्य केल्याने उपस्थितांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात होते महाराष्ट्र शासन व भारतीय जैन संघटना यांच्या वतीने किल्लारी येथे आयोजित दुष्काळ मुक्ती निर्धार समारंभ प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वर्षी झालेला कमी पाऊस आणि संभाव्य दुष्काळी परिस्थिती वर चिंता व्यक्त करून सरकार भक्कमपणे पाठीशी उभे राहिले अशी ग्वाही देऊन मुख्यमंत्री यांनी आगामी काळात निसर्ग निश्चित साथ देईल अशीही अपेक्षा व्यक्त केली

ना संभाजीराव  पाटील यांचे अभिनंदन 
लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना  संभाजीराव  पाटील यांनी लातूर शहरात जे इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान शहरामध्ये सुद्धा राबवले या बद्दल मी त्याचे अभिनंदन करतो शहारत पण जलपुनर्भरणाचे त्यांनी काम चांगले केले आहे . 

किल्लारी आणि परिसरात भूकंप पुनर्वसनाचे यशस्वी कार्य केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचा उल्लेख संकतमोचक असा केला 25 वर्षानंतर आजही भूकंपग्रस्त भागातील काही समस्या राहून गेले आहेत वाढीव कुटुंबांना जागा उपलब्ध करून देऊ त्यांना आवश्यक घर प्लॉट देण्यात येईल याठिकाणी काहींनी स्वतःच्या जमिनी कमी दरात दिल्या अशांनाही प्लॉटची आवश्यकता आहे त्यासंदर्भातही योग्य तो निर्णय लवकरच घेतला जाईल या भागातील प्रादेशिक पिण्याच्या पाण्याच्या योजना वेगवेगळ्या कारणाने बंद पडत आहेत त्या सर्व योजना सोलर वर टाकून 100% सुरू केल्या जातील अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली

महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील काही भागात निसर्गाचे वरदान तर काही भागात दुष्काळ आहे जलसंधारणाच्या माध्यमातून हे चित्र पालटू शकते पाण्याचा थेंब न थेंब माझ्या गावच्या मालकीचा या भावनेतून मुक्त शिवार अभियानाची निर्मिती केली पाणलोटाचा वैज्ञानिक पद्धतीने विकास केला तर कमीत कमी पावसात जलपरी पूर्ण होऊ शकतो संरक्षित सिंचनाची व्यवस्था होऊ शकते मराठवाड्यात या कामांमुळे पाणी पातळी चार मीटरने वाढली असल्याचा उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी केला

या निर्धार कार्यक्रम समारंभास लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, अर्जुन खोतकर ,टाटा ट्रस्टचे अमित चंद्रा, खासदार सुनील गायकवाड, खासदार रवींद्र गायकवाड, आ  मधुकरराव चव्हाण आमदार अमित देशमुख ,आमदार त्र्यंबक नाना भिसे ,आमदार सुधाकर भालेराव, आमदार विनायकराव पाटील आमदार सुरेश धस, आमदार विक्रम काळे, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार बसवराज पाटील ,आमदार राहुल मोटे, जिप अध्यक्ष मिलिंद लातूर ,माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर, गोपाळराव पाटील ,महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य सचिव लातूर जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीणसिंह परदेशी ,विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर,  जिल्हाधिकारी जि श्रीकांत , पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक श्री आर राजा उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे हे सर्व उपस्थित होते सूत्रसंचलन सुनील कोचेटा यांनी केले

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment