अजय असोपा
किल्लारी दि प्रतिनिधी
25 वर्षांपूर्वी आलेल्या विनाशकारी भूकंपाचा धैर्याने सामना करून संकटावर मात करणाऱ्या बहाद्दर जनतेला माझा सलाम आश्या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कौतुक केले . महाराष्ट्र शासन व भारतीय जैन संघटना यांच्या वतीने आयोजित लातूर व उस्मानाबाद जिल्हे दुष्काळ मुक्त करण्याच्या निर्धार समारंभात शरद पवार बोलत होते या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील ,पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर , अर्जुन खोतकर उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते
भारतीय जैन संघटनेने केलेला दुष्काळ मुक्तीचा निर्धार एक चांगला उपक्रम असल्याचे सांगून हे अभियान राबिवण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी पाठबंधारे विभातील तज्ञांशी चर्चा करावी पाहणी लरावी नंतरच हे अभियान सुरू करावे असा सल्ला देऊन शरद पवारांनी या कामी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले दुष्काळाचा प्रश्न कायमचा सुटण्यासाठी बिजेएस ला सर्वांनी मनोभावे सहकार्य करावे असे बोलून ते म्हणाले 25 वर्षांपूर्वी झालेल्या भूकंपानंतर आम्ही या ठिकाणी तातडीने उपाय योजना केल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सर्व महाती घेतली त्या काळी जगातून मदत आली 2 3 दिवसात स्थिति पूर्ववत केली भुकंग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी आप्तेष्ट गेल्याचे दुःख विसरून काळ्या आईची सेवा केली परिणामी उत्तम पीके आली मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी अनेक तज्ञ डॉ पाचारण करण्यात आले कसलेही राजकीय मतभेद न आणता या दुःखातून बाहेर पडण्यासाठी यशस्वी होऊ शकलो
25 वर्षांपूर्वी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यावर आलेल्या संकतानंतर या ठिकाणी जे आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य झाले त्यातून देवाहाची नीती ठरवण्याचे काम झाले असे बोलून शरद पवार यांनी भूकंपाच्या काळातील आठवणीना उजाळा दिला
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment