युरोपमध्ये रंगणार डॉ. जेठवाणी चा नृत्याचा अविष्कार

Wednesday, September 26, 2018

नांदेड - भारत संस्कृति दर्शन अंतर्गत भारत संस्कृति यात्रा हां संकल्प केंद्र शासनाचे वतीने विविध देशातील संस्कृती दर्शनसाठी परराष्ट्रात नृत्याचा आविष्कार हा मोहत्सव आयोजित केला आहे.

भारतातील नामावंत कलावंताना या यात्रेकरिता निवड करून त्यांचा नृत्याचा अविष्कार या महोत्सवाच्या माध्यमाने वेगवेगळ्या राज्यातून भारत संस्कृती व कलांचा प्रदर्शन व्हावा व तेथील लोकांना याचा दर्शन व्हावा या हेतूने हा महोत्सव आयोजित केला जात आहे. हा महोत्सवाचा नवा भाग युरोप येथे होत आहे युरोप खंडातील स्वित्झर्लंड, जर्मनी, नेदरलँड येथे हा महोत्सव 28 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर पर्यंत आयोजित करण्यात आला आहे.या महोत्सवाकरिता नांदेडचे कलावंत व भूमिपुत्र प्रसिद्ध नृत्यकार डॉक्टर भरत जेठवाणी यांची शास्त्रीय नृत्य भरतनाट्यम व लावणी या कला सादर करण्याकरिता निवड झाली आहे.डॉ. जेठवाणी येत्या 27 सप्टेंबर रोजी मुंबई मार्गे युरोपला प्रयाण करणार आहेत.

या तिन्हीही देशांमध्ये भारतीय दूतावास च्या माध्यमाने व हिंदुस्थान आर्ट अँड म्युझिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित केला जाणार आहे. आणि यामध्ये 13 कलावंतांचा समावेश आहे त्यात नांदेडच्या कलावंताचं निवड होणे म्हणजे नांदेड साठी वैभवाची गोष्ट आहे. आता पर्यंत जेठवाणी यानी वेगवेगळ्या सहा देशात आपली कला सादर केली आहे त्यात प्रामुख्याने दुबई मॉरिशियस थायलंड सिंगापूर इंडोनेशिया मलेशिया अशा विविध ठिकाणी त्यांनी आपली कलाकृती सादर केली आहे.विशेष म्हणजे पहिल्यांदाच युरोप खंडात जाऊन आपली कला सादर करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली आहे.त्यांच्या या निवडीबद्दल व कार्यक्रमासाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment