अंबाजोगाई (प्रतिनिधी)- अंबाजोगाई तालुका हा दुष्काळग्रस्त जाहिर करावा व नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत या मागणीचे निवेदन राजेसाहेब देशमुख (सभापती, शिक्षण व आरोग्य समिती,जि.प.बीड), यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना मंगळवार,दि.25 सप्टेंबर रोजी देण्यात आले.
देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,अंबाजोगाई तालुक्यात यावर्षी ही पावसाचे प्रमाण खुप कमी असल्यामुळे शेतीवर याचा खुप मोठा परिणाम झालेला आहे. पाऊस नसल्यामुळे शेतकरी,शेतमजुर व शेतीवर अवलंबून असणारे सर्व घटक आज हवालदील झाले आहेत.पाऊस न पडल्यामुळे गुरांना चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे.शेतकर्याची मानसीक,आर्थिक स्थिती खालावून गेली आहे.त्यामुळे अंबाजोगाई तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. या सर्व बाबींचा विचार करून अंबाजोगाई तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहिर करावा, पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत,सध्या जे पाणी उपलब्ध आहे ते पिण्यासाठी आरक्षित करण्याचे आदेश व्हावेत अशा मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे.सोबतच दुष्काळाची व पिकांचे झालेले नुकसान याचीमाहिती प्रशासनास व्हावी म्हणनू करपलेल्या सोयाबीन पिकाची पेंडी माहितीखातर प्रशासनासमोर सादर करण्यात आली.याप्रश्नी गंभीर होवून प्रशासनाने तात्काळ पावले उचलावित अशी अपेक्षाराजेसाहेब देशमुख व शेतक-यांच्या शिष्टमंडळाने केली.
सदरील निवेदनावर राजेसाहेब देशमुख (सभापती,शिक्षण व आरोग्य समिती, जि.प.बीड),संजयभाऊ दौंड(सदस्य,जि.प.बीड),हाणमंतराव मोरे (व्हाईस चेअरमन, अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना), दाजीसाहेब लोमटे(संचालक,अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना),विलासराव सोनवणे(माजी सभापती,कृषी उत्पन्न बाजार समिती, अंबाजोगाई),विठ्ठलराव ढगे,प्रा.प्रशांत जगताप (पं.स.सदस्य,अंबाजोगाई),अॅड.कल्याणराव लोमटे, अॅड.माधव जाधव, वसंतराव शिंदे, बालासाहेब लुगडे, वैजेनाथ सोनवणे(माजी पं.स सदस्य, अंबाजोगाई),
आण्णासाहेब देशमुख,बालासाहेब जगताप,राजेभाऊ दराडे,चंद्रकांत मोरे,वसंतराव पांडे, प्रविण सोमवंशी,धर्मराज पाटील, मारोतीराव देशमुख, आविनाश भोसले आदींच्या स्वाक्षर्या आहेत.

No comments:
Post a Comment